22 November 2024 12:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON
x

मंगलदास बांदल राज ठाकरेंची कृष्णकुंज'वर भेट घेणार?

जुन्नर : मनसे अध्यक्ष राज ठाकरे जुन्नर दौऱ्यावर आले असता त्यांची कार्यक्रमादरम्यान पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल याच्यासोबत भेट झाली होती. त्यावेळी पैलवान असून सुद्धा त्यांचे भाषण कौशल्य राज ठाकरेंना आवडले होते. त्यामुळे राज ठाकरेंना रमेश वांजळेंची आठवण तुम्ही करुन दिलीत. लोकसभेच्या उमेदवारीचं काय ते पुढं बघू. पण एकदा भेटा,` असं खुद्द राज ठाकरे यांनी हे निमंत्रण पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांना दौऱ्यादरम्यान दिले होते, असं त्यांनी पत्रकारांना कळवलं.

राज ठाकरे यांच्या समोर भाषणादरम्यान ’तुम्ही फक्त हो म्हणा, शिरुरचा खासदारही तुमचाच होईल..’ असे म्हणून त्यांनी स्वत:च्या लोकसभा उमेदवारीची अप्रत्यक्ष मागणी मनसे अध्यक्षांकडे केली होती. राज ठाकरे उपस्थितांना संबोधित करण्यासाठी जाण्याआधी त्याची त्यांनी बाजूला उभे असताना त्यांनी मंगलदास बांदलांना जवळ बोलाविले आणि आजूबाजूला खूप आवाज असल्यामुळे बांदल यांनी राज ठाकरेंना काहीतरी त्यांचा कानात विचारलं. त्यावर त्यांनी थेट घरी येण्याचे निमंत्रण दिल्याचे बांदल यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.

सध्या शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्याविरुद्ध तुल्यबळ उमेदवार राष्ट्रवादीकडे सुद्धा नसला तरी यंदाची शिरूर मतदारसंघाची लोकसभा निवडणूक खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्यासाठी सुद्धा अवघड असल्याचे स्थानिक राजकीय विश्लेषक बोलत आहेत. विशेष म्हणजे मागील निवडणुकीत खुद्द मंगलदास बांदल यांनीच खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांना निवडणून येण्यासाठी मदत केली होती. त्यामुळे मंगलदास बांदल यांना राज ठाकरेंसारख्या प्रचंड आकर्षण असलेल्या नेत्याची साथ मिळाल्यास शिरूर मधील राजकीय चित्र पालटल्यास आश्चर्य वाटणार नाही.

मंगलदास बांदल यांच्या राजकीय प्रवासाचा अंदाज घेतल्यास ते राष्ट्रवादीकडून जिल्हा परिषद सदस्य, भाजपाकडून २००९ मध्ये विधानसभेची उमेदवारी मिळून सुद्धा पराभूत, त्यानंतर पुन्हा राष्ट्रवादीकडून पुणे जिल्हा परिषदेचे बांधकाम समितीचे सभापतीपद आणि कालांतराने पुन्हा राष्ट्रवादीकडून हकालपट्टी असा प्रवास असला तरी मागील जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांनी पत्नी रेखा बांदल यांना अपक्ष म्हणून मोठ्या विक्रमी मतांनी जिल्हा परिषदेत निवडून आणले होते. त्यामुळे आमदार बनण्याची संधी हुकलेले मंगलदास बांदल जर राज ठाकरे यांच्यासारख्या करिष्मा असलेल्या नेत्याच्या बरोबर गेल्यास ते थेट लोकसभेवर सुद्धा जाऊ शकतात अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. सध्याचे राजकीय वातावरण हे सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेसाठी पोषक नसून मनसे पुन्हा जोरदार चर्चेत आली आहे.

परंतु मंगलदास बांदल यांचा इतिहास बघितल्यास राज ठाकरे पूर्ण विचाराअंतीच निर्णय घेतील आणि तसा निरोप मंगलदास बांदल यांना दिला जाईल असं राजकीय विश्लेषक मानतात. परंतु केवळ मंगलदास बांदल नव्हे तर इतर पक्षातील नेते सुद्धा आगामी काळात कृष्णकुंज’ची भेट घेण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x