23 November 2024 3:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, असं मिळेल रेल्वेचं सर्वांत स्वस्त तिकीट, ठाऊक आहे हा फंडा My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती HAL Share Price | डिफेन्स कंपनी HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL Smart Investment | श्रीमंतीच्या मार्गावर घेऊन जाणारा फॉर्म्युला आहे जबरदस्त; व्हाल 2 करोडचे मालक, खास इन्वेस्टमेंट टीप
x

Health First | अंड्याचा केवळ पांढरा भाग खाताय? | मग आधी पिवळ्या बलकाचे ‘हे’ फायदे वाचा

Benefits of Egg Yolk

मुंबई, ०९ सप्टेंबर | लोकांना अनेक वेगवेगळ्या प्रकारे अंडी खायला आवडतात. वास्तविक, अंडे शरीरासाठी खूप लाभदायी असते. तसेच, त्यात अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. अंडी उच्च गुणवत्तेच्या प्रथिनांचा चांगला स्रोत आहे. अंडी आपल्या स्नायूंच्या तंदुरुस्तीसाठी देखील खूप उपयुक्त आहेत. याव्यतिरिक्त आपल्या रक्तातील साखर नियंत्रित करण्यात, रोग प्रतिकारशक्ती मजबूत करण्यात आणि वजन कमी करण्यास अंडी खूप प्रभावी ठरतात.

अंड्याचा केवळ पांढरा भाग खाताय?, मग आधी पिवळ्या बलकाचे ‘हे’ फायदे वाचा – Benefits of Egg Yolk for human body in Marathi :

अंड्यांमध्ये मुबलक प्रमाणत ‘व्हिटामिन डी’ आढळतो, जो तुमच्या हाडांना बळकटी देण्यास फायदेशीर ठरतो. अंडी सर्वोत्तम आणि आरोग्यासाठी उपयुक्त पदार्थांपैकी एक मानली जातात. बऱ्याचदा व्यायामानंतर उकडलेली अंडी खाताना पिवळा भाग बाजूला काढूनच अंडी खाण्याचा सल्ला दिला जातो. त्यामागे वजन आणि चरबी वाढेल अशी कारण सांगितली जातात. उलट त्या पिवळ्या भागामध्ये बरेच काही साामावलेलं असतं. पिवळ्या भागामध्ये पांढऱ्या भागापेक्षा अधिक प्रमाणात कॅल्शियम आणि प्रोटीन असतात. अंड्याचा पिवळा भाग खाण्याचे अनेक फायदे आहेत ते आपण पाहणार आहोत.

मेंदूच्या सामान्य विकासास मदत:
अंड्यांना पिवळ्या बालकाला कोलीनचा मुख्य स्त्रोत मानले जाते, जो आपल्या मेंदूतल्या मुख्य न्युरोट्रांसमीटरपैकी एक, एसिटिल्कोलीनचा एक प्रमुख घटक आहे. आपल्या मेंदूच्या सामान्य विकासासाठी हा घटक खूप महत्त्वाचा आहे.

अँटीऑक्सिडंट बूस्टर:
अंड्यातील पिवळ्या बलकामध्ये ओमेगा-3 फॅटसह, अ, डी, ई आणि के ही जीवनसत्त्वे आढळतात.

Egg Yolk is beneficial for human body :

दृष्टी मजबूत करतात:
डीके पब्लिशिंगच्या ‘हिलिंग फूड्स’ पुस्तकानुसार, अंड्यातील पिवळ बलकामध्ये अँटीऑक्सिडेंट्स, ल्युटिन आणि झेंथाइन असतात. जे आपल्या डोळ्यांचे रक्षण करतात आणि दृष्टी देखील मजबूत करतात

हृदयरोगापासून बचाव करतात:
अंड्यात ट्रिप्टोफेन आणि टायरोसिन हे घटक असतात. यासह, अंड्यांमध्ये अमिनो आम्ल देखील आहेत जे, आपला हृदयरोगापासून बचाव करण्यासाठी उपयुक्त आहेत.

जास्त अंडी खाऊ नका:
अंड्याच्या पिवळ्या बलकातील घटक थेट आपल्या हृदयावर परिणाम करतात. तथापि, अद्याप कोणीही याची पुष्टी केलेली नाही. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अंडे निरोगी एलडीएल ब्लड कोलेस्ट्रॉलच्या तुलनेत संतृप्त अन्न म्हणून शरीराचे पोषण करते. अंड्यातील पिवळ्या बलकाचा उष्मांक 55 आहे. म्हणून, आपण हिवाळ्यामध्ये अंड्यातील पिवळ्या बलकाचे सेवन शकता. परंतु, कुठल्याही गोष्टीचा अतिरेक वाईट, या उक्तीला लक्षात ठेवून अंड्याचे जास्त प्रमाणात सेवन करू नका. एका दिवसाला आपण केवळ 7-8 अंडी खाऊ शकता.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Benefits of Egg Yolk for human body in Marathi.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x