21 November 2024 10:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

भारतातील वाहन उद्योगाला धक्का | फोर्ड चेन्नई व गुजरात सदानंद प्रकल्प बंद करणार

Ford Motors

नवी दिल्ली, ०९ सप्टेंबर | वाहन उद्योगासाठी चिंताजनक बाब आहे. अमेरिकेतील वाहन कंपनी फोर्ड मोटर कंपनी भारतामधील दोन्ही उत्पादन प्रकल्प बंद करणार आहे. फोर्ड कंपनी केवळ विदेशामधून वाहने आयात करणार आहे. या वाहनांची कंपनीकडून भारतात विक्री करण्यात येणार आहे.

भारतातील वाहन उद्योगाला धक्का, फोर्ड चेन्नई व गुजरात सदानंद प्रकल्प बंद करणार – Ford Motors to shut down both its manufacturing plants in India to sell only imported vehicles :

फोर्ड कंपनीने यापूर्वी तामिळनाडूमधील चेन्नई आणि गुजरातमधील सदानंद प्रकल्पात 2.5 अब्ज डॉलरची गुंतवणूक केलेली आहे. हे दोन्ही प्रकल्प कंपनीकडून बंद करण्यात येणार आहेत. कंपनीकडून एकोस्पोर्ट, फिगो आणि एस्पायर या वाहनांची विक्रीही थांबविण्यात येणार आहे. या वाहनांचे देशातील दोन्ही प्रकल्पांमधून उत्पादन घेण्यात येत होते. यामधून फोर्डची दरवर्षी 6,10,000 इंजिन आणि 4,40,000 वाहनांचे उत्पादन घेण्याची क्षमता होती.

कंपनीकडून औपचारिक घोषणा लवकरच:
यापुढे केवळ मस्टँगसारख्या आयात केलेल्या वाहनांची विक्री करण्यात येणार आहे. सुत्राच्या माहितीनुसार फोर्ड कंपनीने पुनर्रचना केली आहे. कंपनी केवळ आयात केलेल्या वाहनांकडे वळाली आहे. याबाबतची औपचारिक घोषणा कंपनीकडून लवकरच होणार आहे. गेल्या काही वर्षांपासून फोर्ड कंपनीला भारतीय वाहन उद्योगाच्या बाजारपेठेत आव्हानांचा सामना करावा लागत आहे.

फोर्ड मोटर, महिंद्रा आणि महिंद्राने संयुक्त प्रकल्प रद्द:
यापूर्वी कंपनीकडून जगभरातील 70 हून अधिक बाजारपेठांमध्ये फिगो, एस्पायर आणि एकोस्पोर्ट वाहनांची निर्यात करण्यात आली होती. चालू वर्षात जानेवारीमध्ये फोर्ड मोटर आणि महिंद्रा आणि महिंद्राने संयुक्त प्रकल्प रद्द करणार असल्याचे जाहीर केले. दरम्यान, फोर्ड इंडियाने २२ हजार ६९० प्रिमीअम एसयूव्ही इंडेव्हर परत घेण्याचा निर्णय 2019 जुलैमध्ये जाहीर केला होता. या वाहनामध्ये असलेल्या एअरबॅग इनफ्लेटरमध्ये दोष आहे की नाही, याची कंपनीने तपासणी केली होती.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Ford Motors to shut down both its manufacturing plants in India to sell only imported vehicles.

हॅशटॅग्स

#Ford(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x