22 November 2024 5:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Health First | चिंताजनक लैंगिक शक्तीसाठी लसणीचे तेल गुणकारी | जाणून घ्या इतरही फायदे

Benefits of garlic oil

मुंबई, ०९ सप्टेंबर | लसूण हा असा पदार्थ आहे जो प्रत्येक भारतीय स्वयंपाक घरात असतोच. कारण लसणीच्या पाकळ्यांचा वापर जेवणातील विशिष्ट चवीसाठी होतो. त्यामुळे प्रत्येक फोडणीसाठी लसूण हवाच. याशिवाय लसणात भरपूर औषधी गुण समाविष्ट असतात. त्यामुळे दररोजच्या आहारात लसूण वापरल्यामूळे अन्नाची चव वाढतेच आणि सोबतच आरोग्यालाही फायदा होतो.

चिंताजनक लैंगिक शक्तीसाठी लसणीचे तेल गुणकारी, जाणून घ्या इतरही फायदे – Benefits of garlic oil for anxious sexual power :

विशेष म्हणजे, लसूण अत्यंत आरोग्यदायी असतोच मात्र याच्या आरोग्यदायी गुणधर्मांचा अत्याधिक लाभ लैंगिक शक्ती कमजोर वा गमावलेल्या रुग्णांना अधिक होतो. त्यामुळे पुरुषांनी लसून जास्त प्रमाणात सेवन करावे. शिवाय लसणीच्या तेलामुळे रोगप्रतिकार शक्तीदेखील वाढते. चला तर लसणीच्या तेलाचे होणारे अन्य फायदे जाणून घेऊयात खालीलप्रमाणे;

* लसणीत सर्वात जास्त अँटी-बॅक्टीरियल आणि अँटी इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळतात. त्यामुळे सकाळी रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्यानं पोटाचे विकारही दूर होतात.

Garlic to boost your sex life?

* लसूणमध्ये अँटी ऑक्सिडेंट घटक मोठ्या प्रमाणात असतात ज्यांचा फायदा कर्करोगासारख्या आजाराच्या विषणुंवर रोख लावण्यासाठी होतो. परिणामी कॅन्सर होण्याची शक्यता कमी होते.

* लसणीच्या तेलामध्ये अँटी-फंगल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. ज्यामुळे त्वचारोग दूर होण्यास मदत होते. खरुज, खाज येणे, सोरायसिस यांसारख्या त्वचेशी संबंधित अनेक प्रकारच्या समस्या दूर करण्यासाठी या तेलाचा फायदा होतो. यासाठी खाज सुटत असलेल्या भागावर कापसाच्या बोळ्याने लसणीचे तेल लावावे. यामुळे लवकर आराम पडतो. शिवाय त्वचेचा संसर्ग दूर होतो.

Does Garlic Increase Your Sex Drive?

* मुरुमांच्या समस्येमुळे चेहऱ्यावर डाग पडले असतील तर यावर लसणीच्या तेल प्रभावी आहे. कारण लसणीच्या तेलामुळे चेहऱ्यावर येणाऱ्या मुरुमांच प्रमाण कमी होतं. यासाठी अर्धा चमचा लसूण तेलात मुलतानी माती मिसळून पेस्ट तयार करा आणि ही पेस्ट फेसपॅक प्रमाणे १५ मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावा. यानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ करा.

* लसणीच्या तेलाचा केसांना खूप फायदा होतो. या तेलामुळे टाळूवरील कोंडा, लाल पुरळ, खाज सुटणे या समस्या कमी होतात. शिवाय टाळू आणि केसांच्या मुळांना योग्य पोषण मिळते. परिणामी केस दाट होतात. शिवाय केसांत उवा झाल्या असतील तर हे तेल गरम करून लावा आणि सकाळी शँम्पूच्या साहाय्याने केस स्वच्छ करा. उवांचा त्रास निघून जाईल.

* आजकाल अकाली केस पांढरे होण्याच्या समस्येने अनेको लोक त्रस्त आहेत. यावर लसूण तेल प्रभावी आहे. लसणीच्या तेलाने केसांवर चांगली मालिश करा आणि एका तासाने शॅम्पूने केस धुवा.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Benefits of garlic oil for anxious sexual power.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x