Health First | स्त्रियांच्या आरोग्यासाठी जास्वंदाचा चहा | साहित्य, कृती आणि फायदे - नक्की वाचा
मुंबई, १० सप्टेंबर | आयुर्वेदामध्ये जास्वंदीच्या झाडाचे एक विशेष स्थान आहे. कारण या झाडाचा त्यात औषधी झाड म्हणून उल्लेख केलेला आहे. जास्वदाच्या मुळापासून ते फुलापर्यंत प्रत्येक भागाचा कोणत्या ना कोणत्या आजारापासून सुटका मिळवण्यासाठी लाभ होतो.
स्त्रियांच्या आरोग्यासाठी जास्वंदाचा चहा, साहित्य, कृती आणि फायदे – Benefits of hibiscus tea for women in Marathi :
दिसायला साधं शुद्ध आणि मुळात म्हणजे देवपूजेसाठी हमखास वापरले जाणारे जास्वंदीचे फुल जितके सुंदर तितके आरोग्यदायी आहे. यामध्ये सर्वसाधारणपणे लाल जास्वंद अनेकांच्या बागेत पाहायला मिळते. मात्र गुलाबी, पांढरा, पिवळा आणि वांगी या रंगाची जास्वंद फार क्वचितच दिसतात. या फुलाला वैज्ञानिक भाषेत हिबिस्कस फ्लॉवर म्हणून ओळखले जाते.
जास्वंद हे एक पवित्र फुल असून औषधी सुद्धा आहे. कारण यात कॅल्शियम, लोह, विटामिन सी आणि फायबर हे पोषक घटक आढळतात. त्यामुळे जास्वंदाच्या फुलाचा वापर प्रामुख्याने स्त्रियांच्या आरोग्यासाठी अतिशय लाभदायक आहे. यापेक्षा विशेष म्हणजे जास्वदांचा चहा बनविता येतो आणि हा चहा प्यायल्याने अधिक लाभ उपभोगता येतात. चला तर जाणून घेऊयात जास्वदांचा चहा कसा बनवायचा आणि त्याचे फायदे काय?
जास्वंदाचा चहा कसा बनवालं?
साहित्य :
* जास्वंदाची फुले ५-७
* लिंबाचा रस १ चमचा
* मध १ छोटा चमचा
* पाणी २ वाटी
कृती:
यासाठी २ कप पाण्यात जास्वंदीची फुलं आणि त्याची सुकी पानं टाकून हे पाणी उकळवावं. जेव्हा हे पाणी अर्ध राहतं, तेव्हा गॅसवरून खाली उतरवून गाळून घ्यावं. त्यानंतर यात १ चमचा लिंबाचा रस आणि १ लहान चमचा मध मिसळावे. अशा प्रकारे जास्वंदाचा स्वादिष्ट चहा तयार.
सेवन:
हा चहा दिवसातून २ ते ३ वेळा प्या. यामुळे तुम्हाला स्वतःत झालेले बदल सहज जाणवतील.
फायदे :
१) वजन कमी होते:
वजन कमी करण्यासाठी जास्वंदीचा चहा उपयोगी आहे. कारण जास्वंदीच्या चहामध्ये नैसर्गिक फॅट बर्न करणारे गुण असतात. शिवाय जास्वंदीच्या फुलांमध्ये भरपूर अँटी ऑक्सीडंट असतात जे शरीरातील मेटाबॉलिजम प्रक्रिया सुधारण्यासाठी मदत करतात. तसेच यात अँटी – इन्फ्लेमेटरी गुण असतात जे उच्च रक्तदाब आणि यकृताशी संबंधित समस्यांपासून सुटका होण्यासाठी मदत करतात.
२) मासिक पाळीच्या समस्यांपासून आराम मिळतो:
साधारणतः पाळीचं चक्र २८ दिवसांचं असतं आणि २८ – ३० दिवसांनंतर पुन्हा मासिक पाळी येतेच. त्यामुळे जेव्हा हे दिवस २८-३०-४० असे होतात आणि त्यानंतरही पाळी येत नाही, तेव्हा अनियमित पाळीची समस्या आहे हे समजून जावे. मुळात महिलांच्या शरीरामध्ये एस्ट्रोजनची कमतरता असल्यामुळे हार्मोन्स असंतुलित होतात आणि यामुळे पाळी येत नाही किंवा उशीराने येते. इतकेच नव्हे तर कधीकधी हेवी फ्लो झाल्यामुळे शरीर कमकुवत होते. त्यामुळे अशावेळी जास्वंदीचा चहा प्यायल्याने या समस्येपासून सुटका मिळते आणि लगेच आराम मिळतो.
The Effects of Hibiscus Tea on Women’s Health :
३) त्वचेच्या समस्यांवर फायदेशीर:
चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी जास्वंदी कोणत्याही वरदानापेक्षा कमी नाही. कारण ज्यांना त्वचेसंबंधित समस्या आहेत त्यांच्यासाठी जास्वंद फायदेशीर आहे. कारण यात लोह, विटामिन सी आणि अँटी ऑक्सीडंट गुणधर्म आहेत जे चेहऱ्यावरील पुरळ, पिंपल्स, काळे डाग, सुरकुत्या मिटवण्यासाठी मदत करतात. शिवाय त्वचेवरील काळेपणा दूर करून त्वचा चमकदार बनवतात.
४) अकाली वृद्धत्वावर प्रभावी औषधी:
आजकालच्या अयोग्य जीवनपद्धतीमुळे वेळेआधी चेहऱ्यावर सुरकुत्या येतात, ज्यामुळे आपण म्हातारे दिसू लागतो. पण, तुम्हाला माहीत आहे का? जास्वंदीची पानं अकाली वृद्धत्वावर औषधाप्रमाणे काम करतात. वास्तविक जास्वंदीच्या पानांमध्ये फ्री रेडिकल्स काढून टाकण्याची क्षमता असते. ज्यामुळे वय वाढण्याची प्रक्रिया हळू होते आणि आपली त्वचा बऱ्याच काळापर्यंत तरूण राहते.
५) डागरहित त्वचेसाठी परिणामकारक उपाय:
जास्वंदीची पानं स्वच्छ पाण्याने धुवून एका भांड्यात उकळवून घ्या आणि त्यानंतर ती मिक्सरमधून वाटून घ्या. पुढे त्यात थोड मध घालून हलक्या हाताने आपल्या चेहऱ्यावर लावा आणि १५ – २० मिनिटांनंतर थंड पाण्याने चेहरा धुऊन घ्या. असं केल्याने चेहऱ्यावरील कोरडेपणा आणि डाग निघून जातात. शिवाय चेहरा उजळ होतो.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Benefits of hibiscus tea for women in Marathi.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Natural Farming | कृषीराजा सुखावणार; केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, 'राष्ट्रीय प्राकृतिक शेती मिशनला' मिळाली मंजुरी
- PAN 2.0 QR CODE | आता पॅन कार्ड होणार PAN QR CODE कार्ड; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, अपडेट नोट करा - Marathi News
- Post Office Interest | पोस्टाच्या 'या' 9 योजनांवर मिळते धमाकेदार व्याज, 10 रुपयांपासून देखील सुरू करू शकता गुंतवणूक
- Post Office MIS | पोस्टाची भन्नाट योजना; प्रत्येक महिन्याला कमवाल 9,250 रुपये, जाणून घ्या पोस्टाच्या योजनेचे फायदे - Marathi News
- SIP Calculator | आता सहज कमवता येतील 5 कोटी, गुंतवणुकीची 'ही' चाल बनवेल कोट्याधीश, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News
- Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News
- Smart Investment | केवळ 150 रुपये वाचवून आपल्या मुलाचं भविष्य सुरक्षित करा, पैसे बचतीतून होईल लाखोंची कमाई
- Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेतलंय का, लवकरात लवकर लोन फेडण्याची टेकनिक आहे कमालीची - Marathi News
- Job Opportunity | तरुणांनो लाखोंच्या घरात पगार घेण्याची वेळ आली; ITBT मध्ये 526 जागांसाठी मेगा भरती सुरू, पटापट अर्ज करा
- Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल