15 December 2024 1:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Saki Naka Rape | नराधम आरोपी मोहन चौहान हा उत्तर प्रदेश जौनपूरचा असल्याची माहिती | 21 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

Sakinaka Rape

मुंबई , ११ सप्टेंबर | मुंबईतील साकीनाका परिसरात झालेल्या बलात्कार पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. महिलेवर बलात्कार करण्यात आल्यानंतर गुप्तांगात रॉड घुसवल्याचा अमानवीय प्रकार समोर आला होता. साकीनाका परिसरात घडलेल्या या घटनेमुळे खळबळ माजली होती. जखमी अवस्थेत महिलेला उपचारासाठी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र मृत्यूशी तिची झुंज अपयशी ठरली आहे. या घटनेवरुन संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त होत असून पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून न्यायालयाने आरोपीला २१ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

नराधम आरोपी मोहन चौहान हा उत्तर प्रदेश जौनपूरचा असल्याची माहिती, 21 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी – Saki Naka rapist Mohan Chauhan belong to Uttar Pradesh :

पोलीस आयुक्त हेमंत नगराळेंनी सांगितले की, १० सप्टेंबरच्या रात्री ३ वाजून २० मिनिटाच्या दरम्यान साकीनाका येथील एका फॅक्टरीमधील वॉचमनने कंट्रोल रुमला फोन करून कळवले की, येथे एका महिलेला मारहाण सुरु आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कंट्रोल रुमने संबंधित पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पोलिसांना कळवले. संबंधित अधिकारी दहा मिनिटाच्या आत तिथे पोहोचले. तिथे त्यांना एका उघड्या टेम्पोत एक महिला अत्यंत गंभीर अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली. त्यावेळी पोलिसांनी विलंब न लावता टेम्पो सरळ राजावाडी रुग्णालयात नेला आणि तिला राजावाडी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्या महिलेवर त्वरीत उपचार सुरु केले. चौकीदाराच्या तक्रारीवर गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिली.

आरोपी कचरा वेचणाऱ्या गाडीवर चालक:
त्यानंतर पोलिसांनी तपास करत एका आरोपीला अटक केली. मोहन चौहान (जौनपूर, उत्तर प्रदेश) असे आरोपीचे नाव आहे. त्याला 21 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात एसीपी ज्योत्स्ना रासम यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्या नेतृत्वात एक स्पेशल टीम बनवण्यात आली आहे. पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने या गुन्ह्यात आता ३०२ कलमही लागू करण्यात आले आहे. आधी याप्रकरणात एक पेक्षा अधिक आरोपी सामील असण्याची शक्यता होती, परंतु आतापर्यंत झालेल्या तपासात एक आरोपी आतापर्यंत सापडला आहे. गुन्ह्याचे कारण आणि गुन्हा कसा घडला हे अजूनही गुपित आहे. हा तपास लवकरात लवकर पूर्ण करून चार्जशीट दाखल करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी प्रसार माध्यमांना विनंती केली आहे, की कृपया असे कोणतेही फोटो, व्हिडिओ प्रसारित करू नका. जेणेकरून पोलीस तपास प्रभावित होईल. आरोपी कचरा वेचणाऱ्या टेम्पोवर ड्रायव्हर आहे. तो रस्त्यावरच रहात होता. त्याच परिसरात आरोपीचे नातेवाईक राहत होते. नातेवाईकांनी त्याला घराबाहेर काढले आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Saki Naka rapist Mohan Chauhan belong to Uttar Pradesh.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x