23 November 2024 3:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, असं मिळेल रेल्वेचं सर्वांत स्वस्त तिकीट, ठाऊक आहे हा फंडा My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती HAL Share Price | डिफेन्स कंपनी HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL Smart Investment | श्रीमंतीच्या मार्गावर घेऊन जाणारा फॉर्म्युला आहे जबरदस्त; व्हाल 2 करोडचे मालक, खास इन्वेस्टमेंट टीप
x

लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत अधिकृत प्रवेश करणार

lavani Samradni Surekha Punekar

मुंबई , १२ सप्टेंबर | लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर अखेर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश करणार आहेत. येत्या 16 सप्टेंबरला मुंबई राष्ट्रवादीच्या कार्यालयात त्यांचा पक्षप्रवेशाचा सोहळा रंगणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये सुरेखा पुणेकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत.

लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत अधिकृत प्रवेश करणार – Maharashtra lavani Samradni Surekha Punekar will join NCP party on 16th September :

मागच्या महिन्यामध्ये सुरेखा पुणेकर यांनी विधानसभेची निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. यावेळी राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले होते. गेल्या महिन्यात त्यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याशी देखील संपर्क साधला होता. त्यावेळी त्यांना राष्ट्रवादीकडून प्रतिसाद मिळाला नव्हता. तेव्हापासूनच त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चा रंगल्या होत्या. दरम्यान आता त्यांचा पक्ष प्रवेश निश्चित झाला आहे.

निवडणूक लढवण्याची इच्छा केली होती व्यक्त:
सुरेखा पुणेकर यांनी नांदेड जिल्ह्यातील देगलूर मतदारसंघाच्या रिक्त जागेवर निवडणूक लढवण्याची इच्छा ही व्यक्त केली होती. काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापुरकर यांचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले होते. यामुळे देगलूर बिलोली मतदार संघाची जागा रिक्त झाली आहे. या जागेवरुन निवडणूक लढवण्यासाठी अनेक इच्छुक आहेत. आता या जागेसाठी लवकरच पोटनिवडणूक होणार आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Maharashtra lavani Samradni Surekha Punekar will join NCP party on 16th September.

हॅशटॅग्स

#NCP(372)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x