24 November 2024 9:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

राम कदमांना आवरा! अफवांच्या आहारी जाऊन त्यांनी सोनाली बेंद्रेला ट्विटरवर श्रद्धांजली वाहिली

मुंबई :  मुंबईमध्ये दहीहंडी उत्सवादरम्यान बोलताना ‘एखादी मुलगी पसंत असेल, पण ती लग्नाला नकार देत असेल तर मला सांगा. तिला पळवून आणण्यात मी मदत करेन’, अशी मुक्ताफळे उधळणारे भाजपचे आमदार राम कदम पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. कॅन्सर झाल्याने उपचार घेण्यासाठी अमेरिकेत असलेल्या अभिनेत्री सोनाली बेंद्रेला अफवांच्या आहारी जाऊन ट्विटरवरून श्रद्धांजली वाहिली आहे. तसे त्यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटरद्वारे ट्विट सुद्धा केलं. परंतु, ती अफवा असल्याचे ध्यानात येताच ते ट्विट डिलीट केले आहे. त्यामुळे राम कदम पुन्हा एकदा ट्रोल होत आहेत.

आधीच वाद अजून क्षमतेला नाही आणि आता अभिनेत्री सोनाली बेंद्रेचं निधन झालं असं राम कदमांनी जाहीरच करून टाकल. राम कदम यांनी आज दुपारी १.५० च्या सुमारास एक टि्वट केल. या टि्वटमध्ये राम कदमांनी लिहिले की, हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीमधली अभिनेत्री आणि एकेकाळी सर्व प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी आणि आपल्या अभिनयाने सर्वांचे डोळ्याचे पारणे फेडणारी अभिनेत्री सोनाली बेंद्रे पडद्याआड. भावपूर्ण श्रद्धांजली…

मात्र २०-२५ मिनिटांनी त्यांना आपली चूक लक्षात आल्यावर अर्ध्यातासानंतर त्यांनी ते टि्वट डिलिट केलंय. आणि पुन्हा “सोनाली बेंद्रे यांच्या निधनाबद्दल अफवा पसरवल्या जात आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होवो अशी मी प्रार्थना करतो’ अशी सारवासारव करत नवीन टि्वट केलं.

त्याआधी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा फेक व्हिडिओ शेअर करण्याचा पराक्रम सुद्धा करून झाला आणि त्यात सुद्धा खरा व्हिडिओ समोर आल्याने ते तोंडघशी पडले होते.

हॅशटॅग्स

BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x