22 November 2024 6:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे
x

JEE Main Result 2021 | जेईई मेन चौथ्या सत्राचा निकाल | इथे पाहा निकाल

JEE main Result 2021

मुंबई, १३ सप्टेंबर | Jee Main Result 2021. नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे घेण्यात आलेल्या JEE MAIN 2021 च्या चौथ्या सत्राचा निकाल आज जाहीर होणार असल्याची माहिती आहे. जेईई मेन चौथ्या सत्राची परीक्षा 26 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर 2021 आयोजित करण्यात आली होती. जेईई मेन परीक्षेचा निकाल आज जाहीर होण्याची शक्यता आहे. jeemain.nic.in आणि nta.ac.in या वेबसाईटवर निकाल जाहीर केला जाईल. निकालासोबत एनटीए जेईई मेन चौथ्या सत्राची अंतिम उत्तर तालिका, कट ऑफ आणि ऑल इंडिया रँकिंग देखील जाहीर करेल अशी माहिती आहे.

JEE Main Result 2021, जेईई मेन चौथ्या सत्राचा निकाल, इथे पाहा निकाल – JEE main Exam Result 2021 session 4 result today check out here online :

जेईई मेन 2021 सत्र 4 चा कसा पाहायचा?
स्टेप 1: निकाल तपासण्यासाठी प्रथम अधिकृत वेबसाइट jeemain.nta.nic.in वर भेट द्या.
स्टेप 2: वेबसाइटवर दिलेल्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
स्टेप 3: तुमचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख सबमिट करून लॉगिन करा.
स्टेप 4: तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
स्टेप 5: निकाल डाऊनलोड करुन त्याची प्रिंट आऊट घ्या

नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे घेण्यात येणारी चौथ्या सत्राची जेईई मेन परीक्षा कोरोना संसर्गामुळं लांबणीवर टाकली गेली होती. देशातील 7.32 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. भारतातील 334 परीक्षा केंद्र आणि भारताबाहेरील 12 शहरांमध्ये ही परीक्षा 26 ऑगस्ट ते 2 सप्टेंबरदरम्यान पार पडली. जेईई मेन परीक्षेतील टॉप अडीच लाख विद्यार्थी जेईई अ‌ॅडव्हान्सड परीक्षेसाठी पात्र ठरणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी एक पेक्षा अधिक सत्राची परीक्षा दिली असेल त्यांचं सर्वाधिक गुण ग्राह्य धरली जातील.

चौथ्या सत्राच्या निकालासोबत एनटीए ऑल इंडिया रँक आणि प्रवर्ग निहाय कट ऑफ लिस्ट जारी करेल. जेईई अॅडव्हान्सड परीक्षा 3 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. तिचा निकाल 15 ऑक्टोबर रोजी जाहीर केला जाईल. जेईई अ‌ॅडव्हान्सड परीक्षेसाठी नोंदणी जेईई मेन परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर सुरु होईल. आज दुपारी जेईई अ‌ॅडव्हान्सड परीक्षेची नोंदणी सुरु होणार आहे. त्याअगोदर निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: JEE main Exam Result 2021 session 4 result today check out here online.

हॅशटॅग्स

#JEEMainExam2021(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x