21 November 2024 5:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE ICICI Mutual Fund | ICICI चा धमाकेदार फंड पाहिलात का, 5 लाखांचे झाले 3.5 करोड, इथे वाढवा पैशाने पैसा - Marathi News Home Loan Alert | तुम्ही सुद्धा होम लोन घेताय का; थांबा या 5 गोष्टींचा तटस्थपणे विचार करा, फायदा होईल - Marathi News Job Opportunity | तरुणांनो लाखोंच्या घरात पगार घेण्याची वेळ आली; ITBT मध्ये 526 जागांसाठी मेगा भरती सुरू, पटापट अर्ज करा Railway Ticket Booking | तिकीट कॅन्सल करण्याऐवजी ट्रान्सफर करा कॅन्सलेशन चार्जेसपासून वाचाल; पहा नवा नियम काय सांगतो Credit Card Instruction | फालतूचा खर्च थांबवण्यासाठी क्रेडिट कार्ड बंद करत आहात; मग ही बातमी फक्त तुमच्यासाठी - Marathi News
x

ती कागदपत्र IOC वेबसाईटवर उपलब्ध | सोमय्यांवर 100 कोटींचा अब्रू नुकसानीची दावा ठोकणार - हसन मुश्रीफ

Minister Hasan Mushrif

कोल्हापूर, १३ सप्टेंबर | भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात आरोप करणं सुरूच ठेवलं आहे. यापूर्वी 11 जणांवर थेट आरोप केल्यानंतर सोमय्यांनी यामध्ये आता आणखी एका मंत्र्यांचं नाव घेतलं आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर सोमय्यांनी मनी लाँडरिंगचे आरोप केले आहेत. हसन मुश्रीफांच्या कुटुंबाने बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप केला आहे. इतकंच नाही तर सोमय्यांनी 2700 पानांचे पुरावे इन्कम टॅक्सला दिले आहेत.

ती कागदपत्र IOC वेबसाईटवर उपलब्ध, सोमय्यांवर 100 कोटींचा अब्रू नुकसानीची दावा ठोकणार – Minister Hasan Mushrif will file defamation case against BJP leader Kirit Somaiya :

राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबियाने शेकडो कोटीचे घोटाळे केले आहेत. फक्त तेव्हढचं नव्हे तर बोगस कंपन्याद्वारे मोठ्या प्रमाणात मनी लाँडरिंग करणं, बेनामी संपत्ती विकत घेणं याचे 2700 पेजेसचे पुरावे आहेत, ते मी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला दिले आहेत, असं सोमय्यांनी सांगितलं. बोगस कंपन्या दाखवून हसन मुश्रीफ कुटुंबियांनी पैसे लाटले. सीआरएम सिस्टम प्रा. लि (CRM Systems PVT LTD ) ही कंपनी प्रवीण अग्रवाल ऑपरेटर आहेत. यामध्ये हसन मुश्रीफ यांचे सुपुत्र नाविद मुश्रीफ (Navid Mushrif) यांनी 2 कोटीचं कर्ज घेतले आहे. ही कंपनी शेल कंपनी/बोगस कंपनी आहे. नाविद मुश्रीफ यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात दाखवलं आहे. त्यामध्ये जी रक्कम दाखवली आहे, 2 कोटीहून जास्त रक्कम दाखवली आहे.

दरम्यान, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी तातडीची पत्रकार परिषद बोलावली. हसन मुश्रीफ म्हणाले, “किरीट सोमय्यांनी माझ्या पक्षाविरुद्ध, पवारसाहेबांविरुद्ध बिनबुडाचे आरोप केले आहेत. सोमय्यांनी माझ्यावर 127 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला. किरीट सोमय्यांच्या CA पदवीबद्दलच शंका आहे. कारण त्यांनी जी कागदपत्र दाखवली ती IOC च्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. जर ती खोटी असती तर त्याचवेळी समोर आलं असतं. आम्ही निवडणूक आयोगालाही कागदपत्र दिली आहेत. आपण नवं काय करतोय असा राणाभीमदेवी थाटात आरोप सोमय्यांनी केला. माझ्यावर इन्कम टॅक्सने धाड टाकली त्यात काहीच मिळालं नाही. अडीच वर्ष झाली धाड टाकून, त्यावर काही कारवाई नाही. आता किरीट सोमय्या उठून आरोप करत आहेत.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Minister Hasan Mushrif will file defamation case against BJP leader Kirit Somaiya.

हॅशटॅग्स

#HasanMushrif(15)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x