23 November 2024 4:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Pitta Dosha | पित्ताच्या त्रासावर ‘हे’ घरगुती उपाय 100 टक्के परिणामकारक | नक्की वाचा

Pitta Dosha

Pitta Dosha | अनेकदा कामाचा व्याप आणि वाढता ताण यामुळे आपल्या जीवनशैलीवर विपरीत परिणाम होत असतो. यात प्रामुख्याने अपुरी झोप, अवेळी फास्ट फूड खाणे अशा अनेक सवयींमुळे शरीरात पित्ताचे दोष निर्माण होतात. परिणामी डोकेदुखी, छातीत जळजळ, उलट्या होणे, अस्वस्थता, करपट ढेकर, मळमळणे, हातापायावर आणि पोटावर लालसर पुरळ येणे अशी पित्ताची लक्षणे दिसून येतात. कधी कधी पित्ताचा त्रास इतका जास्त होतो कि चक्कर येण्याची देखील शक्यता असते. पित्ताच्या त्रासामुळे जेवण जेवू वाटत नाही. तोंड कडवट होते. यामुळे पचनक्रिया देखील बिघडते. मग पित्तावर घरच्या घरी उपाय करायचा असेल तर काय उपचार करावा? आणि केलेला उपचार फायद्याचा ठरेल का? असे प्रश्न अनेकांना पडतात. त्यांच्यासाठी आज आम्ही आजीच्या बटव्यातील असे काही चमत्कारिक घरगुती उपचार घेऊन आलो आहोत जे पित्ताच्या त्रासावर १००% परिणामकारक आहेत. चला तर जाणून घेऊयात उपाय खालीलप्रमाणे;

पित्तशामक आवळा:
आंबट तुरट चवीचा आवळा कफ आणि पित्तनाशक असतो. शिवाय त्यातील ‘व्हिटामिन सी’ अन्ननलिका व पोट स्वच्छ ठेवण्यास मदत करते. याकरिता रोज चमचाभर आवळ्याचे चूर्ण घेतल्यास पित्ताचा त्रास होत नाही. इतकेच काय तर कोमट पाण्यातून आवळ्याचा रस पिणेही फायद्याचे ठरते.

फक्त १ ग्लास थंड दुध:
दूध म्हणजे पूर्ण आहार असे तज्ञ सांगतात. तसेच दुधातील कॅल्शियम आपल्या शरीरासाठी फायदेशीर असते. याच घटकांमुळे पोटात तयार होणारी विघातक आम्लनिर्मिती थांबते आणि अतिरक्त आम्ल दुध खेचून घेऊन त्याचे अस्तित्व संपवते. यासाठी केवळ १ ग्लास थंड दुध प्यायल्याने पित्तामुळे होणारी पोटातील व छातीतील जळजळ कमी होते. शिवाय दुध हे पित्तशामक असते. त्यामुळे ते थंड तसेच त्यात साखर वा इतर कोणताही पदार्थ न मिसळता प्यावे . परंतु पित्तावर लाभदायी ठरण्यासाठी दुधासोबत चमचा भर साजूक तूप मिसळल्यास फायदा होतो.

हिरवागार पुदिना:
पोटातील आम्लाची तीव्रता कमी करण्यासाठी पुदिन्याची पाने मदत करतात. कारण पुदिन्यात वायूहारक गुणधर्म समाविष्ट असतात. त्यामुळे पित्ताचा त्रास होत असल्यास काही पुदिन्याची पाने कापा व पाण्यासोबत उकळा. यानंतर हे पाणी थंड झाल्यावर प्या.

तुळशीची ५ पाने:
आजीचा बटवा असो किंवा पारंपरिक आयुर्वेद यामध्ये तुळशीचा गुणकारी औषधी म्हणून उल्लेख आहे. तुळशीमध्ये आढळणारे एन्टी अल्सर घटक पोटातील / जठरातील अम्लातून तयार होणाऱ्या विषारी घटकांपासून आपल्या शरीराचे संरक्षण करते. यामुळे तुम्हाला पित्ताचा त्रास जाणवत असल्यास किंवा अस्वस्थ वाटत असल्यास तुळशीची केवळ ५ पाने स्वच्छ धुवून चावून चावून खा. यामुळे पित्ताच्या त्रासावर आराम मिळतो.

बहुगुणी आलं:
आल्याचे सेवन शरीरासाठी अनेको फायदे देते. तसेच आल्यातील तिखट व पाचकरसांमुळे आम्लपित्त कमी होते. म्हणूनच पित्तापासून आराम मिळवण्यासाठी आल्याचा एक लहान तुकडा चघळत रहा. आलं तिखट लागत असेल तर ते पाण्यात टाकून उकळून त्याचे पाणी प्या किंवा तुम्ही आल्याचा तुकडा ठेचून त्यावर गुळ टाकून चॉकलेटसारखे चुपा. यामुळे पित्तापासून आराम मिळत.

जिऱ्याचे पाणी:
जिऱ्याच्या सेवनामुळे शरीरात लाळ निर्माण होते आणि यामुळे खाल्लेले अन्न पचण्यासाठी मदत होते. यामुळे पचनक्रिया सुधारते, शरीराचा मेटाबॉलीझम सुधारतो आणि शरीरातील वायू व गॅसचे विकार दूर होतात. यासाठी एकतर जिऱ्याचे दाणे चावून त्याचा रस हळू हळू सेवन करीत खा किंवा जिऱ्याचे दाणे पाण्यात उकळून ते पाणी थंड करून प्या. यामुळे पित्ताच्या त्रासापासून आराम मिळतो.

चमचाभर बडीशेप:
बडीशेपमध्ये एन्टी अल्सर घटक असतात. ज्यांमुळे पचन सुधारते व बद्धकोष्ठता दूर होते. शिवाय पोटात थंडावा तयार होऊन जळजळ कमी होते. यामुळे पित्ताची लक्षणे जाणवल्यास एक चमचा बडीशेप तोंडात चघळावी. शिवाय पित्ताचा त्रास वारंवार होत असेल आणि अस्वस्थ वाटत असेल तर बडीशेपचे दाणे पाण्यात उकळून ते पाणी रात्रभर थंड करून सकाळी प्यायल्याने आराम मिळतो.

एक तुकडा लवंग:
खडा मसाल्यातील लवंग भले चवीला तिखट असेल पण यात अतिरिक्त लाळ खेचून घेण्याची क्षमता असते ज्यामुळे पचनक्रिया सुलभ होते आणि पित्ताचा नॅश होतो. शिवाय लवंगमुळे पोटाचे विकार होत नाहीत. तसेच पित्ताचा त्रास असेल तर लवंग दाताखाली पकडून त्यातून येणारा रस काहीकाळ तोंडात राहू द्या. यामुळे पित्ताची तीव्रता कमी होते आणि आराम मिळतो.

सुंगंधी हिरवी वेलची:
आयुर्वेदानुसार हिरवी वेलची आपल्या शरीरातील वात, कफ व पित्त यांमध्ये समतोल राखण्याचे काम सक्षमरित्या करते. हिरवी वेलची गुणधर्माने सुगंधी असते. हीच वेलची आपले पचन सुधारते आणि पित्ताचा त्रास कमी करते. यासाठी वेलचीचे दोन दाणे ठेचून (सालीसकट/सालीशिवाय) ती पाण्यात टाकून उकळा आणि हे पाणी थंड झाल्यावर प्या. असे केल्यास पित्तापासून तात्काळ आराम मिळेल.

केळं खा:
शरीरासाठी फळं खाणं उत्तम असते हे आपण जाणतो. पण पित्तासाठी केळी औषधाप्रमाणे काम करतात हे किती जण जाणतात? तर मित्रांनो, केळ्यात उच्च प्रतीच्या पोटॅशियमचा साठा असतो. ज्यामुळे केल्याचे सेवन केल्यास पोटात आम्ल तयार होण्याची प्रक्रिया मंदावते. केळ्यातील पोटॅशियम विषहारक द्रव्य म्हणून काम करते व पित्ताचा त्रास कमी होतो. तसेच केळ्यातील ‘फायबर’ शरीराची पचनक्रिया सुरळीत करते. विशेष म्हणजे, फळांमधील काही विशिष्ट घटकांमुळे आम्लांच्या विघातक परिणामांपासून आपले रक्षण होते. त्यामुळे पित्त झाल्यास पिकलेले एक केळे खाणे देखील फायदेशीर ठरते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Home remedy on Pitta Dosha in Marathi check details 10 July 2022.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x