25 November 2024 6:31 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

कोरोनामुळे केंद्राच्याही सूचना आहेत | भातखळकरांचं डोकं फिरलं आहे, त्यांचं डोकं ठिकाणावर नाही - आ. मनीषा कायंदे

MLA Atul Bhatkhalkar

मुंबई, १४ सप्टेंबर | भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. महाराष्ट्रात घडणाऱ्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर परप्रांतीयांची नोंद ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यावर अतुल भातखळकर यांनी आक्षेप घेत, तक्रार दाखल केली आहे. कांदिवलीतील समता नगर पोलिसात ही तक्रार दाखल करण्यात आली.

कोरोनामुळे केंद्राच्याही सूचना आहेत, भातखळकरांचं डोकं फिरलं आहे, त्यांचं डोकं ठिकाणावर नाही – Shivsena MLA Manisha Kayande criticizes BJP MLA Atul Bhatkhalkar over complaint against CM Uddhav Thackeray :

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य हे दोन समाजात तेढ निर्माण करणारे आहे. या वक्तव्याने एक समाज भयभीत झालेला आहे. जर परप्रांतीय गुन्हेगार असतील तर शिवसेना नेते संजय राठोड, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे हे कुठल्या प्रांतातून आले आहेत? मुख्यमंत्र्यांविरोधात कलम 154अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे, असं अतुल भातखळकर यांनी सांगितलं.

दरम्यान, भातखळकरांच्या आक्षेपावर आता शिवसेनेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी जोरदार पलटवार केलाय. अतुल भातखळकर यांचं डोकं फिरलं आहे. त्यांचं डोकं ठिकाणावर नाही, असा घणाघात कायंदे यांनी केलाय. अतुल भातखळकर यांचे डोकं फिरलं आहे. त्याचं डोकं ठिकाणावर नाही. एखादा व्यक्ती कुठून आला, त्याची नोंद नसावी का? पोलिसांना तपास करावा लागतो. पोलिसांना गुन्हेगाराची पार्श्वभूमीची नोंद घ्यावी लागते. यात मुख्यमंत्री काय चुकीचं बोलले? बाळासाहेब ठाकरे यांनी हीच भूमिका कित्येक वर्षांपूर्वी मांडली असल्याचं कायंदे यांनी म्हटलंय.

केंद्राच्याही अशा सूचना आहेत. अनेक राज्यांनी या सूचनेचं पालन करत कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात सरकार अशाच पद्धतीने नोंदी ठेवत आहे. केंद्राच्या अनेक योजना आहेत. ते कामगारांच्या या योजनांसाठी अशा नोंदी ठेवाव्याच लागतात. कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी किती मायग्रेट वर्कर अनेक राज्यातून आपापल्या घरी गेले त्याची नोंद झाली होती. भाजपवाले फ्रटेशनमध्ये आरोप करत आहे. त्यांच्या प्रत्येक आरोपाला उत्तर देणं म्हणजे वेळ घालवण्यासारखा प्रकार असल्याची टीका मनिषा कायंदे यांनी केली होती.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Shivsena MLA Manisha Kayande criticizes BJP MLA Atul Bhatkhalkar over complaint against CM Uddhav Thackeray.

हॅशटॅग्स

#AtulBhatkhalkar(15)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x