23 November 2024 3:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, असं मिळेल रेल्वेचं सर्वांत स्वस्त तिकीट, ठाऊक आहे हा फंडा My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती HAL Share Price | डिफेन्स कंपनी HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL Smart Investment | श्रीमंतीच्या मार्गावर घेऊन जाणारा फॉर्म्युला आहे जबरदस्त; व्हाल 2 करोडचे मालक, खास इन्वेस्टमेंट टीप
x

Udayanraje Vs Shivendra Raje | आम्ही नुसता शब्द देत नाही तर पाळतोही | उदयनराजेंचा शिवेंद्रराजेंना अप्रत्यक्ष टोला

Udayanraje Vs Shivendra Raje

सातारा, १५ सप्टेंबर | खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यातील शीतुयद्ध सर्वश्रुत आहे. सध्या दोघेही भाजपमधून प्रतिनिधित्व करत असले तरी स्थानिक राजकारणात मात्र वारंवार एकमेकांना शह-काटशह देताना दिसून येतात. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शीतयुद्धाचा प्रत्यय पुन्हा एकदा सातारकरांना पाहायला मिळाला आहे. ‘महाराष्ट्रात सातारा विकास आघाडी एकमेव अशी आघाडी असेल जी केलेली कामे लोकांपुढे जाहीरपणे मांडते. कारण, आम्ही केवळ शब्द देत नाही, तर तो पाळतो देखील, असा टोला खासदार उदयनराजे भोसले यांनी पालिका निवडणुकांच्या तोंडावर आमदार शिवेंद्रसिंहराजे यांचे नाव न घेता लगावला आहे.

आम्ही नुसता शब्द देत नाही तर पाळतोही, उदयनराजेंचा शिवेंद्रराजेंना अप्रत्यक्ष टोला – BJP MP Udayanraje Bhosale taunt on BJP MLA Shivendra Raje Bhosale over Satara Development :

नगरपालिका निवडणुकीत दोन्ही राजे एकत्र लढणार की मनोमिलन तुटणार:
सातारा नगरपालिका निवडणुकीत दोन्ही राजे एकत्र लढणार नसल्याचं संकेत भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज स्ट्रीटलाईट शुभारंभ कार्यक्रमात दिले आहेत. सातारा विकास आघाडी केवळ आश्वासन देत नाही तर आम्ही शब्द देतो आणि तो पाळतो असा खोचक टोला त्यांनी नगरविकास आघाडीला म्हणजेच शिवेंद्रराजे भोसले यांना लगावला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात एकमेव अशी सातारा विकास आघाडी आहे की तिने केलेल्या कामाचं जाहीरपणे ऑडिट बोर्डवर लावले होते असं म्हणतं केलेल्या कामाचा पाढा उदयनराजेंनी माध्यमांसमोर वाचला. त्यामुळे होणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत दोन्ही राजे एकत्र लढणार की मनोमिलन तुटणार यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

भाजप नगरसेवक कोणत्या आघाडीच्या बाजूनं जाणार:
2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले भाजपमध्ये दाखल झाले. त्यामुळे साताऱ्यात आता दोन्ही नेत्यांच्या स्वतंत्र आघाड्या निवडणूक लढवतील. साताऱ्यात गेल्यावेळी निवडून आलेले भाजप नगरसेवक कोणत्या आघाडीच्या बाजूनं जाणार हे पाहावं लागणार आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेस साताऱ्यात आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्त्वात निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. त्यामुळं सध्यातरी सातारा नगरपालिकेची निवडणूक तिरंगी होणार असल्याचं चित्र दिसत आहे.

वाढीव हद्दीतील रस्त्यांना प्राधान्य:
उदयनराजे म्हणाले, ‘हद्दवाढीत समाविष्ट झालेल्या शाहूनगर, विलासपूर, करंजे तसेच खेड ग्रामपंचायत या क्षेत्रातील काही भागांना तब्बल चार दशके विजेची सोय नव्हती. त्यामुळे येथील रहिवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. पालिकेने जनरल फंडातून पन्नास लाख रुपये खर्च टाकून पथदिव्यांचे काम पूर्ण केले. या भागात वीज तसेच रस्ते, पाणी अशा मुलूभत सेवा-सुविधा उपलब्ध करणे हे पालिकेचे व सातारा विकास आघाडीचे कर्तव्य आहे. पहिल्या टप्प्यात रस्त्यांची कामे प्राधान्याने मार्गी लावली जातील.

कण्हेर योजनेचे उद्घाटन लवकरच:
वाढीव भागातील तरुणांसाठी खेळाचे मैदान उभारण्यात येईल. याबाबतचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. शाहूपुरी भागाला वरदान ठरणा-या कण्हेर पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन पुढील आठवड्यात केले जाईल, असेही ते म्हणाले. हद्दवाढीत समाविष्ट झालेल्या भागात वीज, पाणी आणि रस्ते अशा मुलभूत सेवांची पूर्तता करणे हे आघाडीचे कर्तव्य आहे. येत्या काही दिवसांत ही कामे प्रत्यक्ष सुरू केली जातील,’ अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: BJP MP Udayanraje Bhosale taunt on BJP MLA Shivendra Raje Bhosale over Satara Development.

हॅशटॅग्स

#Satara(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x