24 November 2024 12:37 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, नव्या वर्षात पगारात 186 टक्क्यांनी वाढ होणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 10 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, 6 महिन्यात 116% परतावा दिला, संधी सोडू नका - BSE: 540259 Apollo Micro Systems Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: APOLLO Post Office Interest | पोस्टाच्या 'या' 9 योजनांवर मिळते धमाकेदार व्याज, 10 रुपयांपासून देखील सुरू करू शकता गुंतवणूक Mutual Fund SIP | एक फॉर्म्युला तुमचं आयुष्य बदलू शकतो; कोटींच्या घरात कमवाल पैसे, म्युच्युअल फंड SIP ठरेल फायद्याची Home Loan | आधीच घरासाठी लोन घेतलं; दुसऱ्या घरासाठी देखील लोन प्रोसेस करायची आहे, असा मिळेल टॉप अप होम लोन FD Calculator | पत्नीच्या नावे FD करून मिळवा जास्तीत जास्त व्याज; FD कॅल्क्युलेटरचा फंडा काय सांगतो पहा - Marathi News
x

अभिनेता सोनू सूद आणि अरविंद केजरीवाल यांच्या भेटीनंतर सोनू सूद आयकर विभागाच्या रडारवर? | कार्यालयाची पाहणी

Sonu Sood

मुंबई, १५ सप्टेंबर | बॉलिवूड अभिनेता सोनू सूद याच्या मुंबई येथील कार्यालयाचे आयकर विभागाने सर्वेक्षण केले. सूदशी संबंधित खात्यांच्या पुस्तकांसोबत छेडछाड केल्याचा दावा आहे तेव्हापासून आयकर विभाग सोनूच्या मालमत्तांचे सर्वेक्षण करत आहे, अशी सुत्रांची माहिती आहे. आयकर विभागाने सोनू आणि त्याच्या कंपनीशी संबंध असलेल्या 6 जागांचे सर्वेक्षण केले आहे.

अभिनेता सोनू सूद आणि अरविंद केजरीवाल यांच्या भेटीनंतर सोनू सूद आयकर विभागाच्या रडारवर?, कार्यालयाची पाहणी – Income tax department surveys at 6 places related to actor Sonu Sood :

सोनू सूद अलीकडेच दिल्ली सरकारने प्रस्तावित केलेल्या ‘देश के मेंटर’ कार्यक्रमाचा ब्रँड अॅम्बेसेडर बनला आहे. सोनू सूद ट्विटर, फोन आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना मदत करत आहे. कोरोनाच्या काळात सोनू सूदने ज्या प्रकारे मजुरांना मदत केली, त्याने सर्वांचे मन जिंकले आहे. आजही तो कुणालाही मदत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसतो.

अभिनेता सोनू सूदने नुकतीच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली होती. यानंतर दोघांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली. यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले होते की, आज सोनू सूद संपूर्ण देशासाठी प्रेरणा बनला आहे. प्रत्येकजण जो त्याच्या घरी मदत मागण्यासाठी येतो, सोनू सूद त्याला मदत करतो. आज अशी अनेक सरकारं आहेत, जी काही करू शकत नाहीत, ते सोनू सूद करतो आहेत. आम्ही दिल्ली सरकारद्वारा काही खास उपक्रमांबद्दल सोनू सूदशी बोललो आहोत.

यानंतर, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंजाब निवडणुकीत प्रचाराबाबतच्या सर्व अटकळांना पूर्णविराम दिला. केजरीवाल पुढं म्हणाले की, दिल्लीमध्ये आम्ही ‘देश के मेंटर’ कार्यक्रम सुरू करणार आहोत. सोनू सूद देशाच्या मार्गदर्शक कार्यक्रमाचा ब्रँड अॅम्बेसेडर असेल.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: Income tax department surveys at 6 places related to actor Sonu Sood.

हॅशटॅग्स

#SonuSood(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x