22 November 2024 12:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839
x

Time Magazine 2021 | नरेंद्र मोदी आणि ममता बॅनर्जींचा समावेश | ममतादीदींचा 'झुंजार नेतृत्व' असा उल्लेख

Time Magazine 2021

मुंबई १६ सप्टेंबर | प्रतिष्ठित टाइम मॅगझिनने २०२१ मधील सर्वात प्रभावी १०० लोकांची यादी जाहीर केली आहे. ही यादी ६ गटांत आयकॉन्स, पायोनिअर्स, टायटन्स, आर्टिस्ट, लीडर्स व इनोव्हेटर्स श्रेणींमध्ये विभागली आहे. वेगवेगळ्या श्रेणींमध्ये भारतातील ५ जण आहेत. सर्वात प्रभावशाली नेत्यांत अमेरिकेच्या भारतीय वंशाच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांचे नाव आहे. तसेच भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीही आहेत. राजकीय नेत्यांत चकित करणारे नाव म्हणजे प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी. पायोनिअर्समध्ये सीरमचे प्रमुख अदर पूनावाला तर आयकॉन्समध्ये भारत वंशाच्या अमेरिकी अॅक्टिव्हिस्ट मंजूषा पी. कुलकर्णी यांचा समावेश आहे.

Time Magazine 2021, नरेंद्र मोदी आणि ममता बॅनर्जींचा समावेश, ममतादीदींचा ‘झुंजार नेतृत्व’ असा उल्लेख – PM Narendra Modi and CM Mamata Banerjee on time list of 100 most influential people of 2021 :

यादीत ५४ महिला:
या वर्षीच्या यादीचे वैशिष्ट्य म्हणजे १०० प्रभावी व्यक्तींमध्ये ५४ महिला आहेत. यात प्रिन्स हॅरीची पत्नी मेगन मर्केल आणि अभिनेत्री स्कार्लेट जोहान्सनचा समावेश आहे.

बायडेन यांच्यासोबत मुल्ला बरादरचेही नाव:
प्रभावी नेत्यांमध्ये अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे नाव समाविष्ट आहे. तर, अफगाणिस्तानातील तालिबान सरकारचे उपपंतप्रधान अब्दुल गनी मुल्ला बरादरचाही यात समावेश आहे. या श्रेणीत रशियाच्या विरोधी पक्षनेत्या अॅलेक्सई नव्हेल्नी यांचा समावेश आहे.

TIME 100 The Most Influential People of 2021 :

१. नरेंद्र मोदी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टाइमने पंडित नेहरू व इंदिरा गांधींनंतर तिसरे सर्वात प्रभावी व्यक्ती संबोधले आहे.
२. कमला हॅरिस – अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांना सर्वात शक्तिशाली महिला राजकीय नेत्या म्हणून दिले महत्त्वाचे स्थान.
३. मंजूषा – अमेरिकेतील वांशिक हिंसाचाराविरुद्ध आंदोलनाच्या मंजूषा पी. कुलकर्णी यांना आदर्श मानले.
४. अदर पूनावाला – सीरमचे प्रमुख अदर पूनावाला आता जगभरातील लसीकरण मोहिमेत मोठा आदर्श ठरू पाहत आहेत.
५. ममता बॅनर्जी – प. बंगालच्या मुख्यमंत्र्यांबाबत टाइम म्हणते, राजकारणातील झुंजार नेतृत्व म्हणून ममता बॅनर्जींचा उदय.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: PM Narendra Modi and CM Mamata Banerjee on time list of 100 most influential people of 2021.

हॅशटॅग्स

#TImeMagazine(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x