22 November 2024 5:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Tirumala Tirupati Devasthanams | शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांची तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी नियुक्ती

Tirumala Tirupati Devasthanams

मुंबई १६ सप्टेंबर | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी आणि शिवसेनेचे नेते मिलिंद नार्वेकर यांना आता एक मोठी जबाबदारी मिळाली आहे. देशातील सर्वाधिक श्रीमंत देवस्थान असलेल्या तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यांची यादी आंध्र प्रदेश सरकारने जाहीर केली. या देवस्थानाच्या ट्रस्ट सदस्यपदी नियुक्ती व्हावी यासाठी देशभरातून मोठी चढाओढ असते. मात्र प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री थेट आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून ही नियुक्ती सुचवत असतात.आणि याच पार्श्वभूमिवर देशातून 24 व्यक्तींची नियुक्ती केली जाते. महाराष्ट्रातून या यादीमध्ये शिवसेनेच्या मिलिंद नार्वेकर यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Tirumala Tirupati Devasthanams, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यपदी – Shivsena secretary Milind Narvekar elected as Tirumala Tirupati Temple Trust member :

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोन केला:
प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या राज्यातील एक नाव या सदस्य यादीमध्ये सुचवणं अपेक्षित आहे.त्याप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि वायएसआर काँग्रेसचे प्रमुख वाय एस जगनमोहन रेड्डी यांच्याशी फोनवरुन संवाद साधला. त्यानंतर महाराष्ट्रातून मिलिंद नार्वेकर यांची अधिकृत नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.त्यामुळे नार्वेकरांना आता मोठी जबाबदारी मिळाली आहे.

आंध्र प्रदेश सरकारने त्याप्रमाणे काल अधिकृत अधिसूचना काढत तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या नवीन सदस्यांच्या नावांची यादी जाहीर केली. शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या खांद्यावर याआधीच मुंबई क्रिकेट संघटनेच्या मुंबई प्रीमिअर लीग (MPL) गव्हर्निंग कौन्सिलच्या अध्यक्षपदाची धुरा आहेच. त्यानंतर आता देशातील सर्वात श्रीमंत देवस्थानाच्या ट्रस्टवर सदस्य म्हणून मिलिंद नार्वेकर यांची नियुक्ती जाहीर झाली आहे. त्यामुळे शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांचं वलय आता देश पातळीवर विस्तारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: Shivsena secretary Milind Narvekar elected as Tirumala Tirupati Temple Trust member.

हॅशटॅग्स

#MilindNarvekar(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x