8 September 2024 7:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | स्वस्त IPO आला रे! पहिल्याच दिवशी मिळेल मोठा परतावा, मोठ्या कमाईची संधी सोडू नका - Marathi News Numerology Horoscope | रविवार 08 सप्टेंबर 2024 | जन्म तारीख आणि अंकज्योतिषशास्त्रानुसार दिवस कसा असेल? - Marathi News Ajay Devgn | 'या' चित्रपटामुळे अजयचं करीयर डुबता-डुबता राहिलं; स्वतः बद्दलचा एक खुलासा - Marathi News Horoscope Today | रविवार 08 सप्टेंबर, 'या' 4 राशींना मिळू शकते खुशखबर, वाचा तुमचं 8 सप्टेंबरचं राशीभविष्य -Marathi News Reliance Share Price | रिलायन्स शेअर्स गुंतवणूकदार मालामाल होणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - Marathi News Credit Card | क्रेडिट कार्डला कंटाळले आहात? फॉलो करा या 5 स्टेप्स, क्रेडिट कार्ड बंद होईल - Marathi News Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर काय परिणाम होणार? - Marathi News
x

कोकणाचा निसर्ग भस्मसात करण्याचा सेनेचा डाव : नारायण राणे

मुंबई : कोकणाचा निसर्ग भस्मसात करण्याचा शिवसेनेचा डाव असल्याचे नारायण राणे पत्रकारांना म्हणाले. कोकण संदर्भातील सर्वच प्रश्नांवर शिवसेनेची नेहमीच दुपट्टी भूमिका करत आली आहे. केवळ पैशांसाठी संपूर्ण कोकणच भस्मसात करण्याचा शिवसेनेचा डाव आहे, असा घणाघाती आरोप नारायण राणे यांनी शिवसेनेवर केला.

रत्नागिरीत होणाऱ्या नाणार ग्रीन रिफायनरीला कोकणात आणण्याचा घाट हा शिवसेनेनेच घातला असल्याचा आरोप महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे सर्वेसेवा नारायण राणे यांनी केला आणि नाणार ग्रीन रिफायनरीला आपला तीव्र विरोध असल्याचेही नमूद केले.

आम्ही कोणत्याही परिस्थितीत नाणार ग्रीन रिफायनरी प्रकल्प होऊ देणार नाही आणि अधिकाऱ्यांनी कोणताही दम देण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्याविरोधात केसेस दाखल करू. मी मुख्यमंत्री फडणवीसांना ही संदर्भात भेटणार असून त्या व्यतिरिक्त ही मला कोणाकडे जावं लागेल हे मला माहित आहे. कोणत्याही परिस्थितीत मी हा प्रकल्प होऊ देणार नाही असे ही नारायण राणे पत्रकारांना म्हणाले.

कोकणात एकूण १३ हजार हेक्टर जमीन लागवडीखाली आहे आणि या भागात जवळ जवळ ७ लाख आंब्याची झाडं असून प्रसिद्ध देवगड आंबाही याच क्षेत्रात येत. १८ गावांतील जनतेचा नाणार ग्रीन रिफायनरीला तीव्र विरोध शिवसेना केवळ दुपट्टी भूमिका घेऊन केवळ पैशांसाठी संपूर्ण कोकणच भस्मसात करण्याचा घाट घालत आहे. या रिफायनरीतून होणाऱ्या सांडपाण्यामुळे मासेमारीच खूप मोठा नुकसान होणार असल्याची भीतीही नारायण राणे यांनी व्यक्त केली.

जर शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरेंचा या प्रकल्पाला विरोध होता तर राज्याचे ‘उद्योगी’ मंत्री आणि केंद्रातील अवजड उद्योग मंत्री शिवसेनेचेच असताना त्यांच्या प्रकल्पांना मान्यताच कशी मिळाली आणि जमीन अधिग्रहनाला मान्यता का दिली असा प्रश्न ही नारायण राणे यांनी उपस्थित केला.

विरोध करणाऱ्या अशोक वालम यांना मातोश्रीवर बोलावून दम दिला जात आहे आणि त्यांना वारंवार धमक्याही येत आहेत. इतकंच नाही तर त्यांच्या पत्नीवरही केसेस टाकल्या आहेत. तुझ्या सात पिढ्या बसून खातील इतका पैसा मिळेल असं पत्र ही अशोक वालम यांना देण्यात आलं.

या ठिकाणी खासदार विनायक राऊत आणि आमदार राजन साळवी यांनी जमिनी घेतल्या असल्याची माहित ही आपल्याकडे आहे असा गंभीर आरोपही नारायण राणे यांनी यावेळी केला. इतकंच काय तर शिवसेनेचे पदाधिकारी इथे दलाली करत फिरताना दिसत आहेत असं ते पुढे म्हणाले.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x