3 December 2024 11:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stocks | कुबेरचा खजिना आहे हा स्वस्त शेअर, दिला 2000% परतावा, खरेदीला गर्दी - BOM: 540693 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - GMP IPO Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, शेअर BUY, SELL की Hold करावा - NSE: YESBANK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: NBCC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, कंपनीबाबत अपडेट, शेअर होणार रॉकेट - NSE: TATAPOWER BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL 7th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी गुड-न्यूज, 53% डीएसह 2 भत्त्यांमध्ये मोठी वाढ झाली
x

कॅप्टन अमरिंदर बंडाच्या पवित्र्यात | 60 पेक्षा जास्त आमदार कॅप्टन सोबत | पंजाब काँग्रेसमध्ये उभी फूट पडणार?

Punjab Congress crisis

चंदीगड, १८ सप्टेंबर | जो राजकीय निरीक्षकांचा होरा होता तसेच घडले. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या विरोधात बंड होत असताना ते स्वतः बंडाच्या पवित्र्यात आले आहेत. काँग्रेस विधीमंडळ पक्षाची सायंकाळी बैठक होत आहे. परंतु त्यापूर्वीच आज शनिवारी दुपारी दोन वाजता कॅप्टन अमरिंदरसिंग यांनीच काँग्रेसच्या आमदारांची बैठक बोलावली आहे.

कॅप्टन अमरिंदर बंडाच्या पवित्र्यात, 60 पेक्षा जास्त आमदार कॅप्टन सोबत, पंजाब काँग्रेसमध्ये उभी फूट पडणार? – Punjab Chief Minister Captain Amarinder Singh calls a meeting of party MLAs :

नेमका हाच कॅप्टन साहेबांचा बंडाचा पवित्रा आहे. कॅप्टन साहेबांबरोबर जेवढे आमदार बैठकीला असतील त्यातूनच त्यांची राजकीय ताकद सिद्ध होईल. अशा स्थितीत काँग्रेसच्या अधिकृत विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला नेमके कोण उपस्थित राहणार आहे?, किती आमदार तेथे उपस्थित राहून कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या विरोधात आवाज उठवतील? वगैरे प्रश्न तयार झाले आहेत.

काँग्रेसची विधीमंडळ पक्षाची बैठक अधिकृतरित्या सायंकाळी बोलवण्यात आली असली तरी दुपारीच आमदारांची बैठक घेऊन कॅप्टन साहेब राजकीय धमाका करणार आहेत. त्यांचे स्वतःचे मुख्यमंत्रीपद काँग्रेस पक्षश्रेष्ठी घालवणार असतील तर काँग्रेसचीच सत्ता पंजाब मधून उखडून टाकण्याचा कॅप्टन अमरिंदरसिंग यांचा या बैठकीतून मनसुबा स्पष्ट होत आहे.

कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्याबरोबर काँग्रेसचे नेमके किती आमदार दुपारच्या बैठकीला असतील यावर त्यांची पुढची खेळी अवलंबून असणार आहे. काँग्रेसचे सुमारे 40 आमदार नवज्योत सिंग सिद्धू यांच्या बरोबर असल्याचे बोलले जात आहे. याचा अर्थ उर्वरित 60 पेक्षा जास्त आमदार कॅप्टन साहेबांबरोबर असतील तर पंजाब काँग्रेसमध्ये उभी फूट पडणे अपरिहार्य आहे. त्याच बरोबर पंजाब मधून काँग्रेसची सत्ता जाणेही अपरिहार्य आहे. कॅप्टन अमरिंदरसिंग आता इरेला पेटले असून ते पक्षश्रेष्ठींना आपली आमदारांची ताकद दाखवून देण्याच्या स्थितीत येऊन ठेपले आहेत. म्हणूनच त्यांनी येत्या तासाभरातच राजकीय सोक्षमोक्ष लावण्यासाठी काँग्रेसच्या आमदारांची बैठक बोलावली आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: Punjab Chief Minister Captain Amarinder Singh calls a meeting of party MLAs.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x