22 November 2024 1:18 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Punjab CM Amrindar Singh Resigns | पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा | पुढे काय करणार?

Punjab Congress crisis

चंदीगड, १८ सप्टेंबर | पंजाब काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेली धुसपूस आज वेगळ्या वळणावर येऊन ठेपली आहे. कारण, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदस सिंग यांनी अखेर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलाय. कॅप्टन अमरिंगदर सिंग यांनी राज्यपालांची भेट घेऊन आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

Punjab CM Amrindar Singh Resigns, पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा राजीनामा, पुढे काय करणार? – Captain Amarinder Singh resigned as Punjab Chief Minister after submitting resignation to governor :

दरम्यान, अमरिंदर सिंग यांच्या विरोधात 40 आमदारांनी दंड थोपटल्यानंतर आज संध्याकाळी काँग्रेसने तातडीची बैठक बोलावली आहे. यात विधीमंडळ नेता निवडण्यात येणार आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग थोड्याच वेळात माध्यमांशी संवाद साधणार (Punjab CM Amrindar Singh Resigns) आहेत, अशी माहिती मुख्यमंत्र्यांचे माध्यम सल्लागार रवीन ठुकराल यांनी दिली आहे.

पंजाबमध्ये एकीकडे विधानसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी होत असताना, काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. पंजाब काँग्रेस दोन गटात विभागली आहे. एक गट नवज्योत सिद्धू यांचा तर दुसरा कॅप्टन अमरिंदर सिंह यांचा आहे. अमरिंदर सिंह यांना मुख्यमंत्रिपदावरुन हटवण्याची मागणी केली जात होती. त्यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अनेक आमदारांनी आवाज उठवण्यात आला होता. हे प्रकरण इतकं वाढलं होतं की काँग्रेसच्या केंद्रीय समितीला हस्तक्षेप करावा लागला.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: Captain Amarinder Singh resigned as Punjab Chief Minister after submitting resignation to governor.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x