21 November 2024 9:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

रामदास कदमांनी प्रसाद कर्वे नामक व्यक्तीच्या मार्फत अनिल परब यांच्याबाबतची माहिती सोमैयांना दिली - वैभव खेडेकर

MNS leader Vaibhav Khedekar

खेड, १८ सप्टेंबर | भाजपचे नेते किरीट सोमय्या हे गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. तसेच्या त्या संदर्भात त्यांनी ईडीकडे कागदपत्रेही सोपवली आहेत. राज्याचे परिवहवन मंत्री आणि शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्या संदर्भातही किरीट सोमय्या यांनी आरोप केले आहेत. आता या प्रकरणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यानेही हात घालताना शिवसेना नेत्यासंदर्भातच एक दावा केला आहे.

रामदास कदमांनी प्रसाद कर्वेंच्या मार्फत अनिल परब यांच्याबाबतची माहिती सोमैयांना दिली – MNS leader Vaibhav Khedekar allegations on Shivsena leader Ramdas Kadam in Anil Parab case :

मनसेचे खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांचा दावा:
शिवसेना नेते आणि राज्याचे माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचे काम केले आहे. इतकेच नाही तर परिवहन मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांच्याबाबतची माहिती रामदास कदम यांनी प्रसाद कर्वे नामक व्यक्तीच्या माध्यमातून माहितीच्या अधिकाराखाली मिळवली. मग ही माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांना दिली असा खळबळ जनक दावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न:
वैभव खेडेकर यांच्या विधानाने कोकणातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. रामदास कदम हे शिवसेनेचे नेते असताना महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केल्याचे देखील खेडेकर म्हणाले. रामदास कदम यांचे मित्र किरीट सोमय्या यांनी रामदास कदम यांच्या देखील बेनामी संपत्तीचे माहिती जगासमोर आणावी असे आवाहन देखील वैभव खेडेकर यांनी केले आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: MNS leader Vaibhav Khedekar allegations on Shivsena leader Ramdas Kadam in Anil Parab case.

हॅशटॅग्स

#Anil Parab(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x