21 November 2024 5:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE ICICI Mutual Fund | ICICI चा धमाकेदार फंड पाहिलात का, 5 लाखांचे झाले 3.5 करोड, इथे वाढवा पैशाने पैसा - Marathi News Home Loan Alert | तुम्ही सुद्धा होम लोन घेताय का; थांबा या 5 गोष्टींचा तटस्थपणे विचार करा, फायदा होईल - Marathi News Job Opportunity | तरुणांनो लाखोंच्या घरात पगार घेण्याची वेळ आली; ITBT मध्ये 526 जागांसाठी मेगा भरती सुरू, पटापट अर्ज करा Railway Ticket Booking | तिकीट कॅन्सल करण्याऐवजी ट्रान्सफर करा कॅन्सलेशन चार्जेसपासून वाचाल; पहा नवा नियम काय सांगतो
x

भूखंड घोटाळ्याप्रकरणी एकनाथ खडसे व त्यांच्या पत्नीविरोधात ईडीकडून आरोपपत्र दाखल | 50 लाखांचे बेनामी उत्पन्न

Eknath Khadse

मुंबई, २० सप्टेंबर | महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यात बनावट पद्धतीने खरेदी करण्यासाठी 50 लाख रुपये अवैधरीत्या वळवले. याच पैशांचा वापर जमीन खरेदीसाठी झाल्याचा आरोप त्यांच्याविरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाने नुकत्याच दाखल केलेल्या आरोपपत्रात करण्यात आला आहे.

भूखंड घोटाळ्याप्रकरणी एकनाथ खडसे व त्यांच्या पत्नीविरोधात ईडीकडून आरोपपत्र दाखल, 50 लाखांचे बेनामी उत्पन्न – ED files charge sheet against NCP leader Eknath Khadse over Pune MIDC Plot Case :

2016 मध्ये खडसे महसूल मंत्री होते, तेव्हा त्यांनी त्यांच्या पत्नी मंदाकिनी आणि जावई गिरीश चौधरी यांना रेकॉर्डमध्ये फेरफार केल्यानंतर सरकारी प्लॉट खरेदी करण्यास मदत केली.

आरोपपत्रात ईडीने उपनिबंधक रवींद्र मुळे यांनाही एक आरोपी बनवले आहे. त्यांनी खडसेंच्या नातेवाईकांना सरकारी रेकॉर्डमधील जमिनीचे बाजार मूल्य 23 कोटी रुपयांवरून 3.7 कोटी रुपये करण्यात मदत केली होती. ईडीने खडसे यांच्यावर आरोप केला की, “त्यांच्या बँक खात्यातून 15 लाख रुपये रोखसह विविध स्त्रोतांकडून मिळालेल्या 50 लाख रुपयांचा वापर केला. अखेरीस 38 लाख रुपये एमआयडीसीतील जमीन खरेदी करण्यासाठी वापरले.”

खडसे यांच्या नातेवाईकांनी जमिनीच्या व्यवहारासाठी एकूण 5.53 कोटी रुपये खर्च केले. एकूण खर्चापैकी मंदाकिनी खडसे यांनी 2.38 कोटी रुपये (एक असुरक्षित कर्ज म्हणून शेल कंपनी, बेंचमार्क बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेडकडून 2 कोटी रुपये आणि खडसेंकडून मिळालेल्या 50 लाख रुपयांतील 38 लाख रुपये) उभारले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: ED files charge sheet against NCP leader Eknath Khadse over Pune MIDC Plot Case.

हॅशटॅग्स

#Eknath Khadse(94)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x