22 November 2024 2:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

TCS, Infosys आणि Wipro सह मोठ्या IT कंपन्यांमध्ये नोकरभरती | १२० टक्क्यांपर्यत वेतनवाढ-बोनस

TCS Infosys Wipro

मुंबई, २० सप्टेंबर | २०२०मध्ये कोरोनाला सुरूवात झाल्यानंतर अनेक क्षेत्रांना मोठा फटका बसला, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, वेतनकपात झाली. मात्र आता दीड वर्षानंतर काही क्षेत्र पुन्हा सावरताना दिसत आहेत.विशेषत: आयटी क्षेत्रात मोठ्या संधी सध्या दिसत आहेत. तरुणांची मोठ्या प्रमाणात नोकरभरती केली जाते आहे. शिवाय आयटी कंपन्या (IT sector) कर्मचाऱ्यांना मोठी वेतनवाढदेखील देत आहेत. कोरोना काळात तंत्रज्ञानाला आलेल्या महत्त्वामुळे आणि त्यामध्ये झालेल्या बदलांमुळे आयटी क्षेत्रात (IT jobs)मोठ्या संधी निर्माण होत आहेत. मागील काही महिन्यात मोठ्या प्रमाणावर नोकरभरती सुरू झाली आहे.

TCS, Infosys आणि Wipro सह मोठ्या IT कंपन्यांमध्ये नोकरभरती, १२० टक्क्यांपर्यत वेतनवाढ-बोनस – TCS Infosys Wipro and other IT giants hiring talents with Big Salary Hike plus Bonus :

आयटीमध्ये कर्मचाऱ्यांची आवश्यकता:
सध्या आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची मागणी ४०० टक्क्यांनी वाढली आहे. फक्त इतकेच नाही तर एखाद्या विशेष कौशल्यात प्रभुत्व असणाऱ्यांनादेखील मोठी मागणी आहे. यामध्ये अॅप्लिकेशन डेव्हलपर, लीड कन्सल्टन्ट, सेल्सफोर्स डेव्हलपर आण साइट रिलाअॅबिलिटी इंजिनियर यांची मागणी १५० ते ३०० टक्क्यांनी वाढली आहे. जानेवारी २०२० ते फेब्रुवारी २०२१ या कालावधीत ही नोकरी देणारी प्रमुख कौशल्ये झाली आहेत.

कंपन्या देतायेत मोठ्या पगाराच्या ऑफर्स: (Recruitment in TCS, Infosys and Wipro IT companies)
फक्त नोकरभरतीचे प्रमाण वाढले आहे असे नाही तर कंपन्या कर्मचाऱ्यांना मोठ्या पगाराच्या ऑफर्स देत आहेत. कंपन्या मोठ्या पगाराच्या ऑफर देत असल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या अपेक्षादेखील वाढल्या आहेत. चांगल्या इंजिनियरला कंपन्या ७० ते १२० टक्क्यांपर्यत वेतनवाढ देत आहेत. ही वेतनवाढ खूपच जास्त आहे. मागील वर्षापर्यत याच कर्मचाऱ्यांना २० ते ३० टक्के वेतनवाढ दिली जात होती. आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने म्हणजे टीसीएसने अलीकडेच जाहीर केले ते महिला कर्मचाऱ्यांसाठी मोठी नोकरभरती करत आहेत. ज्या महिलांच्या करियरमध्ये गॅप आला असेल किंवा मधला काही काळ नोकरी करता आली नसेल त्यांना मोठीच संधी आहे. गुणवान महिला कर्मचाऱ्यांना नव्याने करियरची संधी देण्यासाठी कंपनीने हे पाऊल उचलले आहे.

टीसीएस, इन्फोसिस, विप्रो आणि आयटी क्षेत्रातील इतर कंपन्या जोरदार नोकरभरती करत आहेत. याचा अर्थ आयटी क्षेत्रातील एकूण वेतनाची रक्कम यंदा १.६ ते १.७ अब्ज डॉलरवर जाणार आहे. आयटी क्षेत्रात करियर करू इच्छिणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. शिवाय ज्यांना नोकरी बदलायची आहे त्यांनादेखील जबरदस्त संधी आहे. बंगळूरी, हैदराबाद, चैन्नईसारख्या शहरात जिथे मोठी प्रमाणात आयटी कंपन्या आहेत, रियल इस्टेटमध्येदेखील तेजी येण्याची शक्यता आहे.

कोरोनाच्या संकटकाळात अनेक क्षेत्रांची गाडी रुळावरून घसरलेली असताना आयटी क्षेत्रातील तेजीमुळे तरुणांना मोठाच दिलासा मिळणार आहे. या क्षेत्रातील करियरच्या संधीमुळे मोठा रोजगार निर्माण होणार असून त्यामुळे अर्थव्यवस्थेलादेखील फायदा होणार आहे. यामुळे कर्मचाऱ्यांचे जीवनमानदेखील अधिक उंचावणार आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: TCS Infosys Wipro and other IT giants hiring talents with Big Salary Hike plus Bonus.

हॅशटॅग्स

#Job Alert(17)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x