21 November 2024 7:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Stomach Heaviness Remedies | पोटात जडपणा जाणवतो | हे घरगुती उपाय त्वरित आराम देतील - नक्की वाचा

Heaviness in stomach symptoms

मुंबई, २० सप्टेंबर | बऱ्याच प्रकाराचे आजार आपल्याला वेढतात. कधी ताप, तर कधी मधुमेहासारखे आजार त्रास देतात. परंतु आपणास माहित आहे का, की या सर्व आजारांची सुरुवात पोटापासूनच सुरू होते, कारण असे म्हणतात की जर आपले पोट स्वच्छ नाही तर आपण आजारांना बळी पडू शकता. अशा परिस्थितीत बऱ्याच वेळा जास्त प्रमाणात खाल्ल्यावर पोटात जडपणा जाणवतो. आणि त्यामुळे आळस, अस्वस्थता आणि झोप न येणे सारखे त्रास उद्भवतात. आम्ही सांगत आहोत या साठी काही घरगुती उपाय, ज्यांना अवलंबवल्याने काही मदत होऊ शकते.

पोटात जडपणा जाणवतो, हे घरगुती उपाय त्वरित आराम देतील – Home remedies on heaviness in stomach :

एक चमचा मध:
पोटाच्या जडपणाला दूर करण्यात मध आपली मदत करतो. दररोज जेवण झाल्यावर एक चमचा मध खाल्ल्याने पोटफुगी सारख्या त्रासांमध्ये आराम मिळतो. या शिवाय दररोज किमान आठ ते दहा ग्लास पाणी प्यायल्याने पचन तंत्र चांगल्या प्रकारे काम करतो, ज्यामुळे पोट फुगी सारखे त्रास होत नाही. पोट स्वच्छ झाल्यामुळे आंतड्या देखील चांगल्या प्रकारे काम करतात आणि शरीराला बऱ्याच रोगांपासून वाचविण्यात मदत करतात.

तळलेले किंवा मसालेदार पदार्थ टाळा:
आपण जे काही तळलेले किंवा मसालेदार अन्न खातो किंवा तळलेल्या हिरव्या मिरची चे जास्त प्रमाणात सेवन करतो, तरी ही पोटात जळजळ होते, ज्यामुळे पोटात जडपणा जाणवतो म्हणून अशा अन्नापासून लांब राहणेच योग्य आहे.या शिवाय रात्री जेवल्यानंतर आणि सकाळी वॉक करणे देखील फायदेशीर आहे. असं केल्याने पचन तंत्र बळकट होत आणि अन्न पचन लवकर होत, ज्या मुळे पोटात जडपणाच्या त्रासापासून आराम मिळतो.

Stomach Heaviness Remedies :

वेलची खावी:
पोटात जडपणा वाटत असेल तर वेलची खावी. या मुळे फायदा होतो. आपल्याला फक्त हेच करायचे आहे की नियमितपणे दररोज जेवण केल्यावर दोन वेलची चावून खायची आहे. या शिवाय बडीशोप आणि खडी साखर देखील पोटाच्या जडपणाला दूर करण्यात फायदेशीर आहे. ह्याचे सेवन केल्याने तोंडातून येणारा वास देखील दूर होऊन पोटाच्या त्रासातून आराम मिळतो.

आळशीचे सेवन:
आळशीचे सेवन करणं आपल्या आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते. ह्याचे सेवन केल्याने न केवळ पोटचं स्वच्छ होतो तर पोटाच्या जडपणात देखील आराम मिळतो. दररोज आपण आळशी भिजत घालून ह्याचे सेवन रात्री जेवल्यानंतर करू शकता. चहा,कॉफी चे सेवन देखील जास्त करू नये, कारण हे गरम प्रकृतीचे आहे या मुळे पोटात जळजळ होते आणि पोटात जडपणा जाणवतो.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: Heaviness in stomach symptoms causes and treatment in Marathi.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x