22 November 2024 8:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

अभिजित लिमयेला सोडविण्यासाठी फडणवीसांनी कॉल केला | लखोबा लोखंडेचं लिखाण हे फडणवीसांचं मत होतं का? - रुपाली चाकणकर

Lakhoba Lokhande Facebook page

पुणे, २० सप्टेंबर | लखोब लोखंडे या फेसबुक पेजवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर आक्षेपार्ह लिखाण करून बदनामी करणाऱ्याला सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसानी अटक केली आहे. न्यायालयात हजर करताना शिवसेना आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्याच्या तोंडाला काळे फासले होते.

अभिजित लिमयेला सोडविण्यासाठी फडणवीसांनी कॉल केला, लखोबा लोखंडेचं लिखाण हे फडणवीसांचं मत होतं का? – NCP leader Rupali Chakankar asked question to Devendra Fadnavis over Lakhoba Lokhande Facebook page post :

अभिजित लिमये (रा. सांगली) असे आरोपीचे नाव आहे. तो बेंगळुरु येथे नोकरी करतो. त्याने “मला पकडून दाखवल्यास १०० कोटी रुपयांचे बक्षीस देणार” असे चॅलेंज दिले होते. ठाकरे परिवार व शिवसेना नेते यांच्यावर बदनामीकारक पोस्ट तो सतत फेसबुकवर अपलोड करत होता. त्याला मुंबईमधील माहीम येथून पोलिसांनी शनिवारी पुण्यात आणले होते. (Lakhoba Lokhande Facebook page)

आदित्य चव्हाण यांनी लखोबा लोखंडेची सर्व खोटी 7 फेसबुक अकाउंट हॅक करून सर्व माहिती पोलिसांना सादर केल्यामुळेच तो सापडल्याचे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले होते.

दरम्यान, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या ‘लखोबा लोखंडे’वरुन भाजप आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर खोचक टीका केलीय. अभिजित लिमये याला सोडविण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी कॉल केला. मग त्याने जे लिखाण केल तेच फडणवीसांचं मत होतं का? असा सवाल रुपाली चाकणकर यांनी केलाय. तसंच आयटी सेलला हाताशी घेऊन अशी कामं केली जात आहेत. याला सर्वस्वी जबाबदार भाजप आणि भाजपचे आयटी सेल असल्याचा आरोप चाकणकर यांनी केला आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: NCP leader Rupali Chakankar asked question to Devendra Fadnavis over Lakhoba Lokhande Facebook page post.

हॅशटॅग्स

#RupaliChakankar(24)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x