24 November 2024 7:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

जिल्हा परिषद, महापालिकेच्या निवडणुकीत जुन्या आणि नव्या चेहेऱ्यांनाही संधी देणार | कार्यकर्ताही महत्वाचा - अजित पवार

DCM Ajit Pawar

पुणे, २१ सप्टेंबर | लवकरच जिल्हा परिषद, महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. जसं मागच्या निवडणुकीच्या वेळेला तुम्ही तुमच्या भागातून खासदार देखील निवडून देण्याचा काम केले आहे. तसेच जिल्ह्यातून 10 आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि 2 आमदार काँग्रेसचे निवडून दिले. आम्ही खासदार-आमदार मंत्री झालो, तरी खाली काम करणाऱ्या कार्यकर्त्याला देखील संधी मिळाली पाहिजे. ते आमचं कर्तव्य आहे. म्हणूनच येणाऱ्या जिल्हा परिषद तसेच महापालिकेच्या निवडणुकीत नव्या चेहेऱ्यांचा आणि जुन्यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे’, असं मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे.

जिल्हा परिषद, महापालिकेच्या निवडणुकीत जुन्या आणि नव्या चेहेऱ्यांनाही संधी देणार, कार्यकर्त्याही महत्वाचा – DCM Ajit Pawar said that new faces will be given a chance in the coming Zilla Parishad and municipal corporations elections :

मांजरी बुद्रुक येथे अजित दत्तात्रय घुले, सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

पक्षाला कमीपणा येईल असं काम करू नका:
आपण सर्वजण अतिशय उत्सहात काम करा. पक्षाला कोठेही कमीपणा येणार नाही, असं काम करू नका. आलेल्या प्रत्येक व्यक्तीचं समाधान करणं खूप महत्त्वाचं असतं. सगळ्याचच काम होईल, असं होत नाही’, अशीही सूचना यावेळी अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिली.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: DCM Ajit Pawar said that new faces will be given a chance in the coming Zilla Parishad and municipal corporations elections.

हॅशटॅग्स

#Ajit Pawar(192)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x