4 December 2024 12:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stocks | कुबेरचा खजिना आहे हा स्वस्त शेअर, दिला 2000% परतावा, खरेदीला गर्दी - BOM: 540693 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - GMP IPO Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, शेअर BUY, SELL की Hold करावा - NSE: YESBANK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: NBCC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, कंपनीबाबत अपडेट, शेअर होणार रॉकेट - NSE: TATAPOWER BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL 7th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी गुड-न्यूज, 53% डीएसह 2 भत्त्यांमध्ये मोठी वाढ झाली
x

प. बंगालमध्ये भाजप भुईसपाट होण्याच्या दिशेने | भाजपचे २ खासदार आणि १ आमदार टीएमसीमध्ये प्रवेश करणार

West Bengal BJP

कोलकाता, २२ सप्टेंबर | पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर तृणमूलकडून भाजपला सातत्याने धक्के बसत आहेत. माजी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांनी भाजप सोडून तृणमूलमध्ये प्रवेश केल्यानंतर आता इतर आमदार टीएमसीमध्ये सामील होण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, केंद्रीय गृह मंत्रालयाने (एमएचए) खासदार सुनील मंडल, अशोक डिंडा आणि भाजपचे आमदार अरिंदम भट्टाचार्य यांची केंद्रीय सुरक्षा काढली आहे आणि ममता सरकारला सुरक्षा पुरवण्याचे आवाहन केले आहे.

प. बंगालमध्ये भाजप भुईसपाट होण्याच्या दिशेने, भाजपचे २ खासदार आणि १ आमदार टीएमसीमध्ये प्रवेश करणार – Bengal MP Sunil Mandal Arindam Bhattacharya MLA Ashok Dinda likely to join TMC :

काल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे उद्योगमंत्री आणि तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस पार्थ चॅटर्जी यांनी दावा केला होता की, भाजपचे 10 आमदार लवकरच पक्ष सोडतील. त्यानंतरच केंद्रीय गृह मंत्रालयाचा हा निर्देश आला आहे. मुकुल रॉय यांनी भाजप सोडल्यानंतर भाजप नेते सातत्याने टीएमसीमध्ये सामील होत आहेत. निवडणुकीपूर्वी TMC सोडून भाजपमध्ये सामील झालेले खासदार सुनील मंडल देखील TMC मध्ये परतले आहेत. भाजपमध्ये निवडणुकीपूर्वी गेलेले अनेक नेते परतण्याचा प्रयत्न करत आहेत.

केंद्रीय गृहमंत्रालयाने ममता बॅनर्जी यांच्या सरकारला पत्र लिहून कळवले आहे की, खासदार सुनील मंडल, भाजप आमदार अशोक डिंडा आणि भाजप आमदार अरिंदम भट्टाचार्य यांची केंद्रीय सुरक्षा लवकरच मागे घेतली जाईल. MHA ने आपल्या पत्रात या तिघांनाही राज्याकडून सुरक्षा सुनिश्चित करण्याची सूचना देण्यात आली आहे. त्यांनी म्हटले की, MHA ला वाटते की त्यांना यापुढे केंद्रीय सुरक्षेची गरज नाही. रायगंजमधील भाजपचे आमदार कृष्णा कल्याणी देखील बंडखोर झाले आहेत. ते पक्षाविरोधातही मोठ्या प्रमाणात आवाज उठवत आहेत.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: Bengal MP Sunil Mandal Arindam Bhattacharya MLA Ashok Dinda likely to join TMC.

हॅशटॅग्स

#TMC(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x