24 November 2024 2:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, नव्या वर्षात पगारात 186 टक्क्यांनी वाढ होणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 10 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, 6 महिन्यात 116% परतावा दिला, संधी सोडू नका - BSE: 540259 Apollo Micro Systems Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: APOLLO Post Office Interest | पोस्टाच्या 'या' 9 योजनांवर मिळते धमाकेदार व्याज, 10 रुपयांपासून देखील सुरू करू शकता गुंतवणूक
x

Zee Entertainment & Sony Pictures Merger | झी एंटरटेनमेंट सोनी पिक्चर्समध्ये विलीन

ZEE entertainment & SONY pictures

मुंबई, २२ सप्टेंबर | ZEE Entertainment Enterprises (ZEEL) ने बुधवारी संचालक मंडळाच्या बोर्ड बैठकीत सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडिया (SPNI) आणि ZEEL मध्ये विलीनीकरणाला एकमताने तत्वतः मान्यता दिली आहे. त्यानुसार विलीनीकरण केलेल्या कंपनीमध्ये सोनी ११,६०५.९४ कोटी रुपयांची गुंतवणूक करेल. विलीन झालेल्या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पुनीत गोयंका कायम राहतील. विलीनीकरणानंतर, झी एंटरटेनमेंटकडे ४७.०७ टक्के हिस्सा असेल. तर सोनी पिक्चर्सचा हिस्सा ५२.९३ टक्के असेल.

Zee Entertainment & Sony Pictures Merger, झी एंटरटेनमेंट सोनी पिक्चर्समध्ये विलीन – ZEE entertainment shares hit upper circuit on merger deal with SONY pictures India :

दोन कंपन्यांचे टीव्ही व्यवसाय, डिजिटल मालमत्ता आणि प्रोग्राम लाइब्ररी देखील विलीन केली जाणार आहे. त्याच वेळी, ZEEL आणि SPNI दरम्यान एक विशेष नॉन-बाइंडिंग टर्म शीटवर स्वाक्षरी केली गेली आहे. एकत्रित कंपनीची ४७.०७ टक्के भागीदारी ZEEL भागधारकांकडे असेल आणि उर्वरित ५२.९३ टक्के SPNI भागधारकांकडे असेल. या करारातील बाकी व्यवहार पुढील ९० दिवसात पूर्ण केले जातील. विद्यमान प्रवर्तक झीला आपली हिस्सेदारी ४ टक्क्यांवरून २० टक्के करण्याचा पर्याय असेल. मंडळावरील बहुतेक संचालकांना नेमण्याचा करण्याचा अधिकार सोनी समूहाला असेल. (Zee Entertainment and Sony Pictures Merger)

या विलीनीकरणाने भागधारक आणि भागधारकांच्या हितास हानी पोहचणार नाही, असे मंडळाने म्हटले आहे. विलीनीकरणानंतर सोनी पिक्चर्स एंटरटेनमेंट १.५७५ अब्ज डॉलरची गुंतवणूक करेल. विलीनीकरणानंतर, सोनी एंटरटेनमेंट बहुसंख्य भागधारक असणार आहे. सध्याच्या परिस्थितीत, ZEEL च्या भागधारकांची हिस्सेदारी ६१.२५ टक्के असेल तर १.५७५ अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीनंतर भागभांडवल मध्ये बदल होईल. या गुंतवणूकीनंतर, ZEEL च्या गुंतवणूकदारांचा हिस्सा सुमारे ४७.०७ टक्के असेल. सोनी पिक्चर्सचे भागधारक ५२.९३ टक्के असल्याचा अंदाज आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: ZEE entertainment shares hit upper circuit on merger deal with SONY pictures India.

हॅशटॅग्स

#Business(49)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x