Army Soldier Baba Harbhajan Singh | आजही बाबा हरभजन सिंग यांच्या नावाने चिनी सैनिकांना धडकी भरते
मुंबई, २३ सप्टेंबर | काही गोष्टी या चर्चेच्या विषय बनून जातात. देशातल्या एका सैनिकाची अशी एक कहाणी आहे जी इतिहास बनून गेली आहे पण त्याची चर्चा आजही होते. अश्या काही घटना, गोष्टी असतात, ज्यावर विश्वास ठेवणे थोडे कठीण जाते. असे एक सैनिक आहेत, ज्यांनी मृत्यूनंतर सुद्धा आपलं काम पुर्ण निष्ठेने पार पाडले आहे. शहीद झाल्यानंतरही ते सैन्यामध्ये आहेत, सैन्यात त्यांना देवासारखे पुजलेसुध्दा जाते. आश्चर्यचकीत करणारी हि कहाणी आहे बाबा हरभजन सिंग यांची.
आजही बाबा हरभजन सिंग यांच्या नावाने चिनी सैनिकांना धडकी भरते – The Hero Of Nathula Pass Ghost Of Baba Harbhajan Singh :
३० ऑगस्ट १९४६ ला जन्मलेले बाबा हरभजन सिंग हे ९ फेब्रुवारी १९६६ मध्ये भारतीय सैन्यात, पंजाब रेजिमेंटला शिपाई म्हणून भरती झाले. १९६८ मध्ये ते २३ व्या पंजाब रेजिमेंटसोबत सिक्कीमला कार्यरत होते. ४ ऑक्टोबर १९६८ मध्ये एक काफिला घेऊन जाताना, सिक्कीमच्या नाथूला जवळ त्यांचा पाय घसरून घाटात पडल्यामुळे मृत्यु झाला. तो घाट पाण्याने भरलेला होता व वरून वेगाने येणाऱ्या पाण्याने त्यांचे शरिर वाहून २ किलोमीटर दुर निघून गेले. असं म्हटलं जातं कि, ते आपल्या सहकारी सैनिकाच्या स्वप्नात आले व आपल्या शरिराबद्दल त्यांनी आपल्या सहकार्याला माहिती दिली.
त्यांचे शरीर शोधण्यासाठी भारतीय सैन्याला तीन दिवसांचा अवधी लागला. बाबा हरभजन सिंग यांचे पार्थिव त्यांनी आपल्या सहकार्याला स्वप्नात सांगितलेल्या जागेवरच मिळाले. काही लोकांचं असही म्हणणं आहे कि, स्वप्नातच त्यांनी अशी इच्छा व्यक्त केलेली कि त्यांचं एक स्मारक बनवलं जावं. भारतीय सैन्यानी त्यांच्या इच्छेचा मान ठेवून, त्यांचं शरीर ज्याठिकाणी मिळालं त्याच ठिकाणी त्यांचे स्मारक बांधले. लोकांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वास व आदर होता, त्यामुळेच भारतीय सैन्याने त्यांचं स्मारक 9 किलोमीटर जमिनीच्या आत बनवले, जिथे आता बाबा हरभजन सिंग नावाने एक मंदीरही प्रसिद्ध आहे.
प्रत्येक वर्षी इथे हजारोंच्या संख्येने लोकं दर्शनाला येतात, त्यांच्या समाधीबद्दल लोकांचे म्हणणे आहे कि, इथे पाण्याने भरलेली बाटली ठेवली असता, काही दिवसांनी चमत्कारिक गुण त्या बाटलीत दिसू लागतात आणि ते पाणी २१ दिवस नित्यनेमाने प्यायले असता, आपले सर्व रोग पुर्णपणे बरे होतात.
Chinese PLA wary of Baba Harbhajan’s spirit on Nathula Pass :
असही बोललं जातं कि, मृत्युनंतरसुध्दा बाबा हरभजन सिंग नाथूला जवळ असणाऱ्या चिनी सैन्यांची माहिती आपल्या साथी सैनिकांच्या स्वप्नात येऊन देत असत.
त्यांनी दिलेली माहिती हि शंभर टक्के खरी ठरत असे आणि याच कारणामुळे ते मरणोत्तरही सैन्यामध्ये कार्यरत असल्याचे कळते.
तसेच, भारतीय सेनेने त्यांना आजही आपल्यात जिवंत ठेवले आहे. बाबा हरभजन सिंग यांना नाथुला चे हिरो म्हटले जाते. बाबा हरभजन सिंग यांच्या मंदिरात त्यांचे बुट व बाकी काही सामान ठेवले आहे आणि भारतीय सैन्याचे जवान, बाबाच्या मंदिराची राखण करताना दिसतात व रोज त्यांच्या बुटांना पॉलिश करून त्यांची वर्दी ते स्वच्छ करतात. तिथे त्यांच्या झोपण्याकरता पलंगही लावला जातो. तिथे तैनात असणाऱ्या शिपायांचे म्हणणे आहे कि सकाळी त्यांचे अंथरून विस्कटलेले असते व स्वच्छ केलेल्या बुटांना रोज चिखल लागलेला दिसतो.
बाबाच्या आत्म्याबद्दल असलेली हि रहस्य फक्त भारतच नाही, तर चिनी सेनासुध्दा सांगाताना दिसते.
खुद्द चीनी शिपायांनी बाबा हरभजन सिंग यांना घोड्यावर स्वार होऊन पेट्रोलिंग करताना पहिले आहे.
भारतीय सैनिकांसोबतच चिनी सैनिकही, आजही बाबा आपल्यात असल्याचे सांगतात. म्हणूनच, दोन्ही देशांच्या फ्लॅग मीटिंगच्या वेळी एक खुर्ची बाबा हरभजन सिंगच्या नावे रिकामी ठेवली जाते.
सर्व भारतीय सैनिकांप्रमाणेच बाबा हरभजन सिंग यांनासुद्धा महिन्याचा पगार दिला जातो. सेनेच्या पेरोलमध्ये आजही बाबांचे नाव लिहीले जाते. सेनेच्या नियमानुसार त्यांना पदोन्नती पण दिली जाते. आता बाबांना शिपाई वरून कॅप्टन पदावर बढती मिळाली आहे. प्रत्येक वर्षी त्यांना १५ सप्टेंबर ते १५ नोव्हेंबर पर्यंत दोन महिन्यांची सुट्टी दिली जाते आणि त्यांच्यावर असणाऱ्या विश्वासापोटी स्थानिक लोक त्यांना दोन जोडी वर्दी, टोपी, बुट ह्या सर्व भेटवस्तू देतात. ह्या भेटवस्तू दोन सैनिकांसोबत त्यांच्या गावी पंजाबला पाठवल्या जातात.
त्यांच्या नावे ट्रेनचे बुकिंगसुध्दा केले जाते. तिथे त्यांचे सर्व सामान त्यांच्या आईकडे सोपवले जाते. सुट्टी संपल्यानंतर ते सामान पुन्हा आणून त्यांच्या समाधीजवळ ठेवले जाते. पण, काही वर्षांआधी या प्रेमाला लोकांनी अंधविश्वासाचे नाव दिले, म्हणून त्यांची हि सुट्टीची यात्रा बंद करण्यात आली. बाबांच्या आदरापोटी केलेल्या कामांवर भलेही प्रश्नचिन्ह उभे राहुदेत किंवा त्यांना अंधश्रद्धा म्हणू देत, पण भारतीय सैन्याचे म्हणणे आहे कि त्यांना इथूनच खरी शक्ती मिळते. अशा तर्हेने आजही बाबा आपल्या देशाच्या सेवेत कार्यरत आहेत.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.
Story Title: Indian Army Soldier Baba Harbhajan Singh.
संबंधित कथा
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी खास सरकारी स्कीम, महिना कमवाल 20,000 रुपये, जबरदस्त फायद्याची योजना
- EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, आता EPF खात्यातील पैसे ATM वरून काढा, सहज शक्य होणार, नवे नियम
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- House Rent | पगारदारांनो, कमी पगार आणि त्यामुळे बचती कमी होतेय, मग या टिप्स फॉलो करा, होईल मोठी बचत - Marathi News