16 April 2025 6:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan | एसबीआय बँकेच्या कर्जाचे दर कमी झाले, आता गृहकर्जासाठी किती व्याज द्यावे लागेल पहा Horoscope Today | 16 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 16 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक पुन्हा तुफान तेजीत, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RPOWER Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक मालामाल करणार, सध्याच्या लेव्हल पासून 63 टक्के परतावा मिळेल - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँक शेअर्समध्ये तेजी, पेनी स्टॉकची जोरदार खरेदी, तज्ज्ञांनी काय म्हटलं - NSE: YESBANK Rattan Power Share Price | अप्पर सर्किट हिट, पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, संधी सोडू नका - NSE: RTNPOWER
x

Freshworks IPO | भारतीय कंपनीची अमेरिकी शेअर बाजारात कमाल | IPO येताच 500 कर्मचारी झाले करोडपती

Freshworks IPO

न्यूयॉर्क, २३ सप्टेंबर | बिझनेस सॉफ्टवेअर बनवणारी भारतीय कंपनी फ्रेशवर्क्सची अमेरिकन स्टॉक एक्स्चेंज नॅसडॅकवर शानदार लिस्टिंग झाली आहे. कंपनीने या लिस्टिंगमधून 1 अब्ज डॉलर्स (सुमारे 7500 कोटी रुपये) गोळा केले आहेत, ज्यामुळे त्यांचे शेकडो कर्मचारी एका झटक्यात कोट्यधीश झाले आहेत. फ्रेशवर्क्सचे संस्थापक गिरीश मातृभुतम यांनी ही कमाल केली आहे. गिरीश मातृभुतम हे रजनीकांत यांचे मोठे चाहते आहेत आणि त्यांना त्यांचा आदर्श मानतात.

Freshworks IPO, भारतीय कंपनीची अमेरिकी शेअर बाजारात कमाल, IPO येताच 500 कर्मचारी झाले करोडपती – Freshworks IPO has made 500 employees crorepatis says CEO Girish Mathrubootham :

तामिळनाडूतील त्रिची या छोट्या शहरात 700 चौरस फुटांच्या वेअरहाऊसपासून सुरू झालेल्या त्यांच्या कंपनीने आज अमेरिकन स्टॉक एक्स्चेंज नॅसडॅकमध्ये सूचीबद्ध करून तब्बल 1.3 अब्ज डॉलर्स उभारले आहेत. एवढेच नाही, तर कंपनीने 500 हून अधिक कर्मचाऱ्यांना कोट्यधीश केले आहे. यातील सुमारे 70 कर्मचारी 30 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत आणि बरेच जण अलिकडच्या वर्षांत कॉलेज पूर्ण केल्यानंतर कंपनीत रुजू झाले होते.

तामिळनाडूतून सुरुवात:
कंपनीची कार्यालये चेन्नई आणि सॅन मातेओ, यूएसए येथे आहेत. ही एक सॉफ्ववेअर ऐज अ सर्व्हिस कंपनी आहे. या आयपीओमधून कंपनीने नॅस्डॅकवर एक अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त रक्कम उभारली आहे. कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश मातृभुतम आणि सुरुवातीचे गुंतवणूकदार Accel आणि Sequoia यांना IPO लिस्टिंगचा मोठा फायदा झाला आहे. यासह कंपनीचे शेकडो कर्मचारीदेखील कोट्यधीश झाले आहेत.

फ्रेशवर्क्स स्टॉकने बुधवारी नॅस्डॅकवर $ 43.5 प्रति शेअरवर व्यापार करण्यास सुरुवात केली, जी कंपनीच्या प्रति शेअर 36 डॉलरच्या लिस्टिंग किंमतीपेक्षा 21 टक्के जास्त होती. यामुळे कंपनीला 12.3 अब्ज डॉलरचे मार्केट कॅप मिळाले आहे.

कर्मचारी कसे झाले कोट्यधीश?
कंपनीचे 76 टक्के कर्मचारी शेअर्सचे मालक आहेत. अनेक तरुण कर्मचाऱ्यांनी काही वर्षांपूर्वी महाविद्यालयातून पदव्या घेतल्या होत्या आणि त्यांच्या मेहनतीमुळे त्यांना कंपनीत शेअर्स मिळाले. फ्रेशवर्क्सने दोन वर्षापूर्वी सिकोइया कॅपिटल आणि एक्सेलसारख्या गुंतवणूकदारांकडून $ 3.5 अब्ज डॉलर्सच्या मूल्यांकनासाठी $154 दशलक्ष निधी गोळा केला होता. या अनोख्या यशामुळे कंपनी चर्चेत आली आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Freshworks IPO has made 500 employees crorepatis says CEO Girish Mathrubootham.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Freshworks(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या