4 December 2024 12:12 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stocks | कुबेरचा खजिना आहे हा स्वस्त शेअर, दिला 2000% परतावा, खरेदीला गर्दी - BOM: 540693 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - GMP IPO Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, शेअर BUY, SELL की Hold करावा - NSE: YESBANK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: NBCC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, कंपनीबाबत अपडेट, शेअर होणार रॉकेट - NSE: TATAPOWER BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL 7th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी गुड-न्यूज, 53% डीएसह 2 भत्त्यांमध्ये मोठी वाढ झाली
x

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाला धक्का | आ. लक्ष्मण जगतापांचे कट्टर समर्थक अरुण पवार, विष्णू शेळकेंचा राष्ट्रवादीत प्रवेश

Pimpri Chinchwad BJP

पिंपरी-चिंचवड, २३ सप्टेंबर | आगामी महापालिका निवडणुकीपूर्वीच पिंपरी-चिंचवड भाजपमध्ये ‘गळती’ सुरू आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये इनकमिंग जोरात सुरु आहे. आज भाजप पदाधिकारी आणि मराठवाडा जनसंघाचे अध्यक्ष अरुण पवार, भाजप सह्याद्री आदिवासी मंडळाचे विष्णू शेळके, मोशी भाजप युवा कार्यकर्ते ज्ञानेश्वर बोऱ्हाडे यांनी त्यांच्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा जाहीर प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाला धक्का, आ. लक्ष्मण जगतापांचे कट्टर समर्थक अरुण पवार, विष्णू शेळकेंचा राष्ट्रवादीत प्रवेश – Pimpri Chinchwad BJP leaders Arun Pawar and Vishnu Shelke Dnyaneshwar Bolhade join NCP party :

पिंपरी-चिंचवडमध्ये स्थायिक झालेल्या मराठवाड्यातील रहिवाशांच्या उन्नतीसाठी अरुण पवार गेली अनेक वर्षे कार्यरत आहेत. त्यांनी भाजपमध्ये विविध पदे भूषवली आहेत. ते आमदार लक्ष्मण जगताप यांचे कट्टर समर्थक होते. माजी नगरसेवक राजेंद्र जगताप आणि अतुल शितोळे यांनी त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परत येण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

उपमुख्यमंत्री पवार यांनी या सर्वांचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्वागत केले आणि पिंपरी-चिंचवड शहरातील पक्ष संघटना एकजूटीत वाढविण्याची आणि महापालिका निवडणुकीसाठी सज्ज होण्याची सूचना केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष संजोग वाघरे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, अतुल शितोळे, पक्षाचे मुख्य संघटक अरुण बोल्हाडे यांच्यासह इतर नेते आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Pimpri Chinchwad BJP leaders Arun Pawar and Vishnu Shelke Dnyaneshwar Bolhade join NCP party.

हॅशटॅग्स

#NCP(372)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x