16 April 2025 9:10 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan | एसबीआय बँकेच्या कर्जाचे दर कमी झाले, आता गृहकर्जासाठी किती व्याज द्यावे लागेल पहा Horoscope Today | 16 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 16 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक पुन्हा तुफान तेजीत, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RPOWER Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक मालामाल करणार, सध्याच्या लेव्हल पासून 63 टक्के परतावा मिळेल - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँक शेअर्समध्ये तेजी, पेनी स्टॉकची जोरदार खरेदी, तज्ज्ञांनी काय म्हटलं - NSE: YESBANK Rattan Power Share Price | अप्पर सर्किट हिट, पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, संधी सोडू नका - NSE: RTNPOWER
x

Indian Stock Market | भारतीय शेअर बाजार 2024 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलरचा होणार

Stock Market

मुंबई, २४ सप्टेंबर | भारतीय शेअर बाजार नवनवीन विक्रम प्रस्थापित करत आहे. भारतीय बाजारपेठेतील परदेशी गुंतवणूकदारांचा वाढता आत्मविश्वास हे यामागील मोठे कारण आहे. या तेजीच्या दरम्यान, काही दिवसांपूर्वी भारतीय शेअर बाजाराने फ्रेंच शेअर बाजाराला मागे टाकत जगातील सहावा मोठा शेअर बाजार बनण्याचा बहुमान पटकावला.

Indian Stock Market, भारतीय शेअर बाजार 2024 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलरचा होणार – Indian Stock Market will become 5th largest in world With 5 trillion dollar value by 2024 :

भारताचे स्टॉक मार्केट आता टॉप -5 मार्केटमध्ये सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जगातील सर्वात मोठे ब्रोकरेज हाऊस गोल्डमन सॅक्सने भारतीय शेअर बाजारासंदर्भात एक नवीन अहवाल प्रसिद्ध केला आहे. यानुसार, पुढील तीन वर्षांत भारतीय शेअर बाजाराचा आकार $ 5 ट्रिलियन (सुमारे 5 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्स) चा टप्पा पार करणार आहे आणि जगातील पाचवा सर्वात मोठा शेअर बाजार बनेल. सध्या त्याचे मूल्य 3.5 ट्रिलियन अमेरिकन डॉलर्स आहे.

काय आहे रिपोर्टमध्ये:
गोल्डमन सॅक्सच्या अहवालानुसार, भारतीय स्टार्टअप्स झपाट्याने वाढत आहेत. येत्या काळात त्यांचा आकार खूप मोठा होईल. आतापर्यंत 2021 मध्ये भारतीय स्टार्टअप्सने आयपीओद्वारे 10 अब्ज डॉलर्स म्हणजेच 75 हजार कोटींपेक्षा जास्त निधी उभारला आहे.

असे मानले जाते की, पुढील दोन वर्षे आयपीओ बाजार असेच गरम राहील. येत्या 36 महिन्यांत किमान 150 कंपन्या बाजारात सूचीबद्ध होण्याची शक्यता आहे. या कंपन्यांचे एकूण मार्केट कॅप $ 400 अब्ज च्या जवळ असेल. साहजिकच यामुळे बीएसईच्या एकूण मार्केट कॅपमध्ये मोठी वाढ होईल.

शेअर बाजाराचे मूल सध्या $ 3.5 ट्रिलियन:
सध्या, भारतीय शेअर बाजाराचे एकूण मूल्य $ 3.5 ट्रिलियन आहे. पुढील तीन वर्षांत 150 कंपन्या सूचीबद्ध झाल्यानंतर, एकूण मार्केट कॅप 2024 पर्यंत $ 5 ट्रिलियनपर्यंत वाढेल. यूके सध्या पाचव्या क्रमांकावर आहे. ज्याचे मार्केट कॅप भारताच्या $ 3.6 ट्रिलियनपेक्षा थोडे अधिक आहे.

80 कोटी इंटरनेट युजर्स:
येत्या काळात ई-कॉमर्स, इंटरनेट, इंटरनेट रिटेल आणि मीडिया व्यवसायात तेजी येईल असे या अहवालात म्हटले आहे. सध्या देशात 80 कोटी इंटरनेट युजर्स आहेत आणि 50 कोटींहून अधिक स्मार्टफोन वापरकर्ते आहेत. आगामी काळात स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या खूप वेगाने वाढेल, ज्यामुळे इंटरनेट वापरकर्त्यांची संख्याही वाढेल. याशिवाय, भारतात इंटरनेटदेखील खूप स्वस्त आहे. कोरोना संकटामुळे ऑनलाइन इकोस्टिस्टिमला चालना मिळाली आहे आणि आता सर्व काही ऑनलाइन झाले आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Indian Stock Market will become 5th largest in world With 5 trillion dollar value by 2024

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Stock Market(1200)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या