22 November 2024 1:06 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

कार्यकर्त्यांनी शांत राहावं | सोमय्यांनीही संयमाने दौरा करावा, चुकीचं वक्तव्य करु नये - हसन मुश्रीफ

Minister Hasan Mushrif

कोल्हापूर, २४ सप्टेंबर | भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबियांवर कोट्यावधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप केला आहे. त्या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या हे कोल्हापूरला जाणार असताना त्यांना पोलिसांकडून अडणवण्यात आलं होतं. त्यावरुन भाजप नेत्यांनी महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्ला चढवला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा सोमय्या यांनी कोल्हापूरला जाण्याची घोषणा केली आहे. मंगळवार, 28 सप्टेंबर रोजी सोमय्या कोल्हापूर दौऱ्यावर असतील. त्यावेळी सोमय्या यांनी कोल्हापूरला येऊ द्या. त्यांची कुठल्याही प्रकारे अडवणूक करु नका, असं आवाहन हसन मुश्रीफ यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलं आहे.

कार्यकर्त्यांनी शांत राहावं, सोमय्यांनीही संयमाने दौरा करावा, चुकीचं वक्तव्य करु नये – Minister Hasan Mushrif appeal to activists not to obstruct BJP leader Kirit Somaiya’s visit to Kolhapur :

किरीट सोमय्या यांनी दोन कारखान्यांबाबत माझ्यावर आरोप केले होते. कोल्हापुरात कायदा-सुव्यवस्थेची अडचण निर्माण झाल्यामुळे सोमय्यांना मागच्यावेळी प्रतिबंध केला होता. मंगळवारी ते कोल्हापुरात येणार आहेत. त्यांना कुणीही अडथळा निर्माण करु नका, त्यांना येऊ द्या. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशी कुठलीही कृती करु नका. त्या दिवशी ऐकू वाटलं नाही तर टीव्ही बंद करा, शेतात जा. ते कुठे जातील, काय बोलतील ते त्यांना बोलू द्या, असं आवाहन मुश्रीफ यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केलं आहे.

तसंच सोमय्या यांनाही माझी विनंती आहे की त्यांनी आपला दौरा संयमाने करावा. कुठल्याही प्रकारचं चुकीचं वक्तव्य करु नये. त्यांनी आमच्या कामाची माहिती घ्यावी. मी त्यांना वारंवार सूचना केली होती की जिल्ह्यात आमचं राजकीय, सामाजिक, सहकारात असलेल्या कामाची त्यांनी माहिती घ्यावी. जिल्ह्यातील भाजपच्या परिस्थितीही त्यांनी पाहावी, असंही मुश्रीफ यावेळी म्हणाले.

आप्पासाहेब नलावडे सहकारी साखर कारखाना 2012 मध्ये बंद पडण्याच्या अवस्थेत होता. तेव्हा शेतकऱ्यांची विनंती होती की कारखाना सुरु ठेवावा. ब्रिक्स इंडिया या माझ्या मित्राच्या कंपनीला मी विनंती केली की कारखाना चालवावा. आठ वर्षात 80 कोटीच्या वर तोटा या कंपनीला आला. दोन वर्ष आधीच सगळं नुकसान सोसून ही कंपनी कारखाना संचालक मंडळाच्या ताब्यात देऊन ही कंपनी गेली. सांगायचा उद्देश हाच की तपासणी करणाऱ्या यंत्रणेनं या कंपनीचं हार घालून स्वागत करायला हवं. कारण एवढा तोटा सहन करुन शेतकऱ्यांना एफआरपी दिला आहे. कामगारांचे पैसे दिले आहेत.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Minister Hasan Mushrif appeal to activists not to obstruct BJP leader Kirit Somaiya’s visit to Kolhapur.

हॅशटॅग्स

#HasanMushrif(15)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x