22 November 2024 12:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON
x

नैतृत्वावर आरोप करत घनसावंगी विधानसभेतील शिवसेना पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

मुंबई : शिवसेनेमध्ये निष्ठावंतांना डावलून पैशाच्या मोबदल्यात उपऱ्यांना उमेदवारी दिली जात असल्याचा आरोप करत घनसावंगी विधानसभेतील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पाणीपूरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या निमित्ताने सेनेला घनसावंगी विधानसभा मतदासंघात फटका बसण्याची शक्यता.

त्यामुळे मित्र पक्ष म्हणून सत्तेत सामील असलेल्या भाजपने आणि शिवसेनेमध्ये पक्ष फोडाफोडी सुरूच असून त्यात शिवसेनेतून भाजपमध्ये जाणाऱ्यांच प्रमाण आजही मोठं आहे. आगामी निवडणुकीपूर्वी शिवसेनेला भाजपकडूनच सर्वाधिक धक्के बसणार हे सिद्ध होत आहे. त्यामुळे शिवसेनेतील अजून अनेक मतदारसंघात भाजपने फिल्डिंग लावली असल्याचे वृत्त आहे.

आज मुंबईमध्ये शिवसेनेचे घनसावंगी विधानसभा मानेपुरी येथील नाराज पदाधिकारी ज्यामध्ये रमेश वाघ महाराज, पुरुषोत्तम जायभाये, पंकज निकम, मछिंद्र घुले, गजानन वाघ, राजेश वाघ व कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे शिवबंधन तोडून भाजपचं कमळ हाती घेतला आहे. त्यावेळी उपस्थित शिवसैनिकांनी आरोप केला की, ‘आम्ही गेल्या ३० वर्षांपासून शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेत पक्षाच्या प्रत्येक कामाला गती दिली. परंतु पैशाच्या जोरावर घनसावंगी विधानसभेची उमेदवारी शिवसेनेने हिकमत उढाण यांना दिली आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांना शिवसेनेत नेहमीच डावलण्यात येत व नाकर्त्या आणि उपऱ्या नेत्यांना पैशासाठी उमेदवारी बहाल केली जाते, असा आरोप रमेश वाघ महाराज यांनी केला आहे. पक्ष नैतृत्वाने याआधी सुद्धा अनेकवेळा उमेदवारी देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, प्रत्येक वेळी शिवसेनेने आमची उमेदवारी ऐनवेळी डावलली. त्यामुळेच आम्ही पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्यावर विश्वास ठेऊन भाजपमध्ये प्रवेश केल्याचे रमेश वाघ महाराज यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x