23 November 2024 3:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, असं मिळेल रेल्वेचं सर्वांत स्वस्त तिकीट, ठाऊक आहे हा फंडा My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती HAL Share Price | डिफेन्स कंपनी HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL Smart Investment | श्रीमंतीच्या मार्गावर घेऊन जाणारा फॉर्म्युला आहे जबरदस्त; व्हाल 2 करोडचे मालक, खास इन्वेस्टमेंट टीप
x

महागाई, इंधन दरवाढ, बेरोजगारीमुळे सामान्यांचं कंबरडं मोडलंय | पण त्यावर बातम्या बनत नाहीत - जयंत पाटील

Minister Jayant Patil

परभणी, २४ सप्टेंबर | देशातील महागाई, इंधन दरवाढ, बेरोजगारीवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केंद्र सरकार आणि भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्ला चढवलाय. आज महागाईने जनसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीमध्ये शर्यत लागली आहे. पण बातम्यांवर काहीच दाखवले जात नाही. तिकडे अमेरिका, अफगाणिस्तानबाबत सांगितलं जातं. परंतु, इकडे सोयाबीनचे भाव पडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे, हे कोणी दाखवत नाही. फॉल्स प्रपोगंडा राबवला जात आहे, असा आरोप जयंत पाटील यांनी जिंतूरच्या संवाद यात्रेत केला.

महागाई, इंधन दरवाढ, बेरोजगारीमुळे सामान्यांचे कंबरडे मोडलंय, पण त्यावर बातम्या बनत नाहीत – Media never talked on inflation unemployment fuel rates hike said minister Jayant Patil :

भाजपचे चुकीचे धोरणांबाबत जागृती करा:
भारतीय जनता पक्षाचे चुकीचे धोरण समोर मांडत जनसामान्यांना जागृत करण्याचा प्रयत्न करा. या भागात आपल्याला आपल्या विचारांचा आपला माणूस निवडून आणायचा आहे, असे आवाहनही जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले. आज ज्या लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला त्यांचे जयंत पाटील यांनी स्वागत केले. विजय भांबळे यांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने कार्यक्रम पार पाडला त्यासाठी त्यांचे विशेष अभिनंदनही केले.

राष्ट्रवादीच्या बुथ कमिट्या जर मजबूत असणं गरजेचं:
मागच्या विधानसभा निवडणुकीत दुर्दैवाने राष्ट्रवादीला अपयश आले. एक प्रभावी, उमद्या नेतृत्वाचा पराभव झाला. सर्व काही असताना विजय भांबळे यांना पराभव स्वीकारावा लागला. बुथ कमिट्या जर मजबूत असतील तर आपला पराभव शक्य नाही असेही जयंत पाटील म्हणाले. पक्षाला काम करणाऱ्या लोकांची गरज, मागे पुढे न पाहता संपूर्ण कार्यकारिणी झाडून काढा. कोणतीही तमा न बाळगता निष्क्रीय पदाधिकाऱ्यांवर कारवाई करा असे आदेशही जयंत पाटील यांनी दिले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Media never talked on inflation unemployment fuel rates hike said minister Jayant Patil.

हॅशटॅग्स

#JayantPatil(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x