21 November 2024 10:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

IPL 2021 | CSK vs KKR Live Score | KKR'चं CSK'ला 171 धावांचे लक्ष | चेन्नईलाही धक्के सुरु

IPL 2021 CSK vs KKR Live

अबुधाबी, २६ सप्टेंबर | आयपीएल फेज -2 मध्ये आजही (IPL 2021 CSK vs KKR Live Score) दोन सामने आहे. पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यात खेळला जात आहे. KKR ने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आणि 20 ओव्हरमध्ये 171/6 चा स्कोअर बनवला आहे. 172 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना CSK ची धावसंख्या 10 ओव्हपर्यंत 1 गडी गमावून 89 धावा आहे. सामन्याचा लाइव्ह स्कोअर पाहण्यासाठी येथे क्लिक करा…

IPL 2021 Chennai Super Kings Vs Kolkata Knight Riders Live Score :

शानदार सुरुवातीनंतर गायकवाड बाद:
लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईने चांगली सुरुवात केली. ऋतुराज गायकवाड आणि फाफ डु प्लेसिसने पहिल्या विकेटसाठी 74 धावांची भागीदारी केली. केकेआरमध्ये ही जोडी जोडी सतत दबाव बनवत होती. पण आंद्रे रसेलने ही भागीदारी मोडून काढली आणि संघाला पहिले यश मिळवून दिले. 28 चेंडूत 40 धावा केल्यावर ऋतुराज बाद झाला.

रनआऊट झाला गिल:
KKR ने पहिल्याच षटकात दमदार सुरुवात केली आणि शुभमन गिलने दीपक चहरला सलग दोन चौकार मारले. षटकाच्या 5 व्या चेंडूवर, CSK ने गिलच्या विरोधात एलबीडब्ल्यूसाठी अपील केली आणि अंपायरनेही आऊट दिले, पण गिलने एक रिव्ह्यू घेतला आणि चेंडू स्टंपच्या रेषेत चुकल्याने गिलला जीवदान मिळाले. मात्र, पुढच्याच चेंडूवर गिल धावबाद झाला आणि तंबूत परतला. कोलकाताच्या संघात कोणताही बदल झालेला नाही, तर चेन्नईच्या ड्वेन ब्राव्होच्या जागी सॅम कुरानला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले आहे.

शार्दुल पहिल्याच चेंडूने चमकला:
गिलच्या विकेटनंतर व्यंकटेश अय्यर आणि राहुल त्रिपाठी यांनी केकेआरची जबाबदारी सांभाळली आणि दुसऱ्या विकेटसाठी 40 धावा जोडल्या. अय्यरला हळूहळू गती मिळत होता, पण नंतर शार्दुल ठाकूरने त्याच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर अय्यरची (18) विकेट घेतली, ज्यामुळे चेन्नईला दुसरे यश मिळाले. अय्यरच्या विकेटनंतर ओएन मॉर्गन देखील काही विशेष दाखवू शकला नाही आणि जोश हेझलवूडने 14 चेंडूत 8 धावांवर बाद केले. फाफ डु प्लेसिसने कर्णधार मॉर्गनची सीमारेषेवर शानदार कॅच घेतली.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: IPL 2021 CSK vs KKR Live Score updates.

हॅशटॅग्स

#IPL2021(28)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x