3 December 2024 11:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stocks | कुबेरचा खजिना आहे हा स्वस्त शेअर, दिला 2000% परतावा, खरेदीला गर्दी - BOM: 540693 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - GMP IPO Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, शेअर BUY, SELL की Hold करावा - NSE: YESBANK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: NBCC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, कंपनीबाबत अपडेट, शेअर होणार रॉकेट - NSE: TATAPOWER BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL 7th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी गुड-न्यूज, 53% डीएसह 2 भत्त्यांमध्ये मोठी वाढ झाली
x

कोल्हापूर आरोप पर्यटन दौरा | कोणीही रोखत नसताना सोमैयांच्या 'मला रोखून दाखवा, मला रोखून दाखवा चिथावण्या

Kirit Somaiya

मुंबई, २७ सप्टेंबर | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या आज पुन्हा एकदा कोल्हापूर दौऱ्यावर निघाले आहेत. त्यापूर्वी त्यांना मुंबईतील सिद्धीविनायक मंदिराच्या बाहेरुनच सिद्धीविनायकाचं दर्शन घेतलं. त्यावेळी किरीट सोमय्या (Kirit Somaiya tour of Kolhapur) यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पुन्हा एकदा आव्हान दिलंय. आता शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनाच मी नोटीस दिली की हिम्मत असेल तर मला रोखून दाखवा, अशा शब्दात सोमय्या यांनी पवार आणि ठाकरेंना एकप्रकारे चॅलेंज केलं आहे.

BJP leader Kirit Somaiya’s allegations tour of Kolhapur unnecessarily challenging state government for breaking news :

सिद्धीविनायकाचं दर्शन घेऊन मी कोल्हापुरला अंबेमातेच्या दर्शनासाठी जात आहे. कोल्हापुरात अंबाबाईला प्रार्थना करणार की, तू शक्तीची माता आहे. तू पापाच्या राक्षसाचा वध केला होता. अंबेमातेच्या चरणी प्रार्थना करणार की भ्रष्टाचाररुपी राक्षस जो महाराष्ट्रात फोफावला आहे, त्याचा वध करण्याची शक्ती आम्हाला दे. त्यावेळी पत्रकारांनी सोमय्यांना प्रश्न विचारला की तुम्हाला मागच्या वेळी पोलिसांनी कुठली नोटीस दिली आहे का? त्यावर सोमय्या म्हणाले की आता मी त्यांना नोटीस दिली आहे. मी शरद पवारांना नोटीस दिली, मी उद्धव ठाकरेंना नोटीस दिली. मी कोल्हापूरच्या पोलीस आयुक्तांना सांगितंल, कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्याला सांगितलं की, तुमच्यात हिम्मत असेल तर मला थांबवून दाखवा. आम्ही जाणार, अंबाबाईचं दर्शन घेणार आणि त्या भ्रष्टाचाररुपी राक्षसाचा वध करणार, असा इशाराही सोमय्या यांनी यावेळी दिलाय.

मुश्रीफ यांची प्रतिक्रिया:
मंत्री मुश्रीफ म्हणाले, भाजपचे नेते किरीट सोमैया हे मंगळवारी (दि. 28 सप्टेंबर) कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. लक्ष वेधण्यासाठी सोमैया काहीही वक्तव्य करत आहेत. मात्र, त्यांनी चिथावणीखोर भाषण न करता आपला दौरा संयमाने पूर्ण करावा, असा सल्ला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी किरीट सोमैया यांना दिला आहे. किरीट सोमैया यांनी कोल्हापुरात येऊन त्यांनी आमचे सामाजिक-राजकीय काम पाहावे. जिल्हा बँकेचे उल्लेखनीय काम आणि वाढता नावलौकिक कामाचा आढावा घ्यावा, असेही मुश्रीफ म्हणाले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: BJP former MP Kirit Somaiya’s allegations tour of Kolhapur unnecessarily challenging state government for breaking news.

हॅशटॅग्स

#KiritSomaiya(31)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x