19 April 2025 12:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC Reliance Share Price | कोटक सिक्युरिटीज बुलिश, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूकदारांसाठी अपडेट - NSE: RELIANCE
x

पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिनांचा पुतळा बॉम्बने उडवला | बलुच बंडखोरांचे कृत्य

Muhammad Ali Jinnah's statue destroyed

इस्लामाबाद, २७ सप्टेंबर | बलुचिस्तानच्या बंडखोरांनी बलुचिस्तान प्रांतातील किनारी शहर ग्वादरमध्ये बॉम्बस्फोट घडवून पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांचा पुतळा (Muhammad Ali Jinnah’s Statue Destroyed) नष्ट केला. सोमवारी ‘डॉन’ वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, सुरक्षित क्षेत्र समजल्या जाणाऱ्या मरीन ड्राईव्हवर जूनमध्ये उभारण्यात आलेला पुतळा रविवारी सकाळी स्फोटकांनी उडवण्यात आला.

Pakistan founder Muhammad Ali Jinnah’s statue destroyed by Baloch militants in a bomb attack :

रिपोर्ट्सनुसार, स्फोटात पुतळा पूर्णपणे नष्ट झाला. बीबीसी उर्दूच्या वृत्तानुसार, प्रतिबंधित संघटना बलूच रिपब्लिकन आर्मीचे प्रवक्ते बबगर बलूच यांनी ट्विटरवर स्फोटाची जबाबदारी स्वीकारली आहे. बीबीसी उर्दूने ग्वादरचे उपायुक्त मेजर (निवृत्त) अब्दुल कबीर खान यांच्या हवाल्याने सांगितले की, या प्रकरणाची उच्च स्तरावर चौकशी केली जात आहे. ते म्हणाले की, स्फोटके लावून जिनांचा पुतळा उद्ध्वस्त करणारे दहशतवादी या भागात पर्यटक म्हणून घुसले होते.

सीनेटर बुगती यांची दोषींवर कडक कारवाईची मागणी:
अब्दुल कबीर खान यांच्या मते, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, पण तपास एक -दोन दिवसात पूर्ण होईल. ते म्हणाले, ‘आम्ही या प्रकरणाकडे सर्व बाजूंनी पाहत आहोत. दोषी लवकरच पकडले जातील.’ बलुचिस्तानचे माजी गृहमंत्री आणि सध्याचे सिनेटर सरफराज बुगती यांनी ट्विट केले, ‘ग्वादरमध्ये कायदे-ए-आझमचा पुतळा नष्ट करणे हा पाकिस्तानच्या विचारधारेवर हल्ला आहे. मी अधिकाऱ्यांना विनंती करतो की जियारत येथील कायदे-ए-आझम निवासस्थानावरील हल्ल्याप्रकरणी आम्ही ज्याप्रमाणे गुन्हेगारांना शिक्षा केली त्याप्रमाणे त्यांना शिक्षा करावी.”

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Pakistan founder Mohammad Ali Jinnah huge statue destroyed in blast in Balochistan Gwadar.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Pakistan(26)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या