22 November 2024 1:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Parambir Singh | परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ | खंडणी प्रकरणाचा तपास CID'कडे वर्ग

Parambir Singh

मुंबई, २८ सप्टेंबर | ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त आणि सध्या अज्ञातवासात असलेले परमबीर सिंह यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यांच्यावर एकामागे एक गुन्हे दाखल होत आहेत. परमबीर सिंह (Parambir Singh) यांच्याविरोधात कोट्यवधी रुपयांच्या खंडणीचा गुन्हा कोपरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. याचा तपास आता राज्य गुन्हे अन्वेषण तपास यंत्रणा म्हणजेच, सीआयडी करणार आहे.

A case of ransom of crores of rupees was registered against Parambir Singh at Kopari police station. This will now be investigated by the State Criminal Investigation Agency (CID) :

मुंबई आणि ठाण्याचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे तत्कालीन उपायुक्त पराग मणेरे, बांधकाम व्यावसायिक संजय पुनमिया, व्यापारी सुनील जैन, मनोज घाटकर आणि इतर तीन अधिकाऱ्यांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. हा तपास आता सीआयडीकडे गेल्याने परमबीर सिंह यांच्या अडचणीत कमालीची वाढ झाली असून या प्रकरणी देखील चौकशी करिता हजर राहण्याचा समन्स सीआयडीकडून लवकरच बजावला जाणार आहे.

खंडणी प्रकारण काय आहे?
तत्कालीन ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांच्या कार्यकाळात यूएलसी घोटाळ्याप्रकरणी एका बांधकाम व्यावसायिकाला ठाणे पोलिसांनी अटक केली होती. त्या बांधकाम व्यावसायिकाच्या विरोधात मोक्का कायद्यांतर्गत कारवाई होणार होती. मात्र, मोक्का अंतर्गत कारवाई टाळण्यासाठी परमबीर सिंह, ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे तत्कालीन उपायुक्त पराग मणेरे, सुनील जैन, संजय पुनामिया, मनोज घोटेकर यांनी ४ कोटी ६८ लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा आरोप या बांधकाम व्यावसायिकाच्या नातेवाईकाने केल्यानंतर याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता हा तपास सीआयडी करणार आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Parambir Singh extortion case will be investigated by CID.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x