22 November 2024 7:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Minister Anil Parab Vs ED | मी काही चुकीचं केलेलं नसल्याने ईडीच्या चौकशीला सामोरे जात आहे - अनिल परब

Anil Parab

मुंबई, २८ सप्टेंबर | शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माझ्या मुलीचं शपथ घेऊन मी मागेच सांगितलं होतं की मी काही चुकीचं केलेलं नाही. आताही तेच सांगत आहे. मी काहीच चुकीचं काम केलं नाही. मला दुसरं समन्स आल्याने मी ईडीच्या चौकशीला सामोरे जात आहे, असं परिवहन मंत्री अनिल परब (Minister Anil Parab Vs ED) यांनी सांगितलं.

I have received another summons from the ED. I’m going to be interrogated. I have not done anything wrong said minister Anil Parab : Minister Anil Parab Vs ED

दुसरं समन्स आल्यानंतर अनिल परब आज ईडीच्या (Minister Anil Parab Vs ED) चौकशीला जात आहे. त्यांनी ईडीच्या चौकशीला जाण्यापूर्वी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. मला ईडीचं दुसरं समन्स मिळालं आहे. मी चौकशीला जात आहे. शिवसेनाप्रमुख आणि मुलीची शपथ घेऊन मागे सांगितलं आहे की मी काहीही चुकीचं काम केलं नाही. चौकशीत जे प्रश्न विचारले जातील त्याचे उत्तर देईल. कशासाठी बोलावलं मला माहीत नाही. मला कोणतंही स्पष्ट कारण दिलं नाही. चौकशीला गेल्यावर कळेल. तिकडे गेल्यावर अधिकृतपणे कळेल, असं परब यांनी सांगितलं.

ईडीने मला आज चौकशीला बोलावलं आहे. त्यामुळे मी चौकशीला सामोरे जात आहे. माझ्याकडून कोणतीही चूक झाली नाही. हे मला नक्की माहीत आहे, असं ते म्हणाले. इतर शिवसेना नेत्यांचीही ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. त्यावर त्यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी त्यावर बोलण्यास नकार दिला. मी माझ्या बाबतीत बोलत आहेत. इतरांबद्दल बोलणार नाही, असं त्यांनी सांगितलं.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Minister Anil Parab will face the ED enquiry.

हॅशटॅग्स

#Anil Parab(14)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x