21 November 2024 4:31 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE ICICI Mutual Fund | ICICI चा धमाकेदार फंड पाहिलात का, 5 लाखांचे झाले 3.5 करोड, इथे वाढवा पैशाने पैसा - Marathi News Home Loan Alert | तुम्ही सुद्धा होम लोन घेताय का; थांबा या 5 गोष्टींचा तटस्थपणे विचार करा, फायदा होईल - Marathi News Job Opportunity | तरुणांनो लाखोंच्या घरात पगार घेण्याची वेळ आली; ITBT मध्ये 526 जागांसाठी मेगा भरती सुरू, पटापट अर्ज करा Railway Ticket Booking | तिकीट कॅन्सल करण्याऐवजी ट्रान्सफर करा कॅन्सलेशन चार्जेसपासून वाचाल; पहा नवा नियम काय सांगतो Credit Card Instruction | फालतूचा खर्च थांबवण्यासाठी क्रेडिट कार्ड बंद करत आहात; मग ही बातमी फक्त तुमच्यासाठी - Marathi News IPO GMP | स्वस्त IPO आला रे, गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO
x

कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाशी संबंधित प्रकरणांच्या मीडिया रिपोर्टिंगवर बंदी | मुंबई हायकोर्टाचे आदेश

Bombay High Court

मुंबई, २८ सप्टेंबर | मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाशी संबंधित प्रकरणांच्या मीडिया रिपोर्टिंगवर बंदी घातली आहे. सुनावणीदरम्यान, न्यायालयाने अशा प्रकरणांच्या मीडिया रिपोर्टिंगमध्ये संस्थेचे नाव प्रकाशित आणि प्रसारित न करण्याचे निर्देशही जारी केले आहेत. दरम्यान, अशा प्रकरणांमध्ये सतत अतिशयोक्तीपूर्ण अहवाल येत असून यामुळे आरोपी आणि पीडित पक्षाच्या अधिकारांचे उल्लंघन होत असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

The Bombay High Court has banned media reporting of sexual harassment cases in the workplace. During the hearing, the court also issued instructions not to publish and disseminate the name of the organization in the media reporting of such cases :

न्यायमूर्ती गौतम पटेल न्यायालयाचे आदेश आणि निर्णयांच्या अहवालावर बंदी घालताना म्हणाले की, या प्रकरणांमध्ये आदेश देखील सार्वजनिक किंवा अपलोड केले जाऊ शकत नाहीत. आदेशाच्या प्रतीमध्ये पक्षकारांच्या व्यक्तिगत माहितीचा उल्लेख केला जाणार नाही. कोणताही आदेश खुल्या न्यायालयात न देता न्यायाधीशांच्या चेंबरमध्ये किंवा ऑन कॅमेऱ्यात दिला जाईल असेही ते म्हणाले.

नियमांचे उल्लंघन केल्यास न्यायालयाचा अवमान मानला जाईल
जर कोणत्याही पक्षकारांकडून त्याचे उल्लंघन झाल्यास त्याला न्यायालयाचा अवमान मानले जाईल असे न्यायालयाने म्हटले आहे. कोणताही पक्ष, त्यांचे वकील किंवा साक्षीदार कोर्टाच्या आदेशाचा तपशील किंवा खटल्यातील अन्य दाखल केल्याचा तपशील माध्यमांसमोर उघड करू शकत नाहीत असे कोर्टाने आपल्या आदेशात म्हटले आहे. त्याचवेळी, केवळ वकील आणि खटलाधारकांना सुनावणीत भाग घेण्याची परवानगी असेल असेही न्यायालयाने म्हटले आहे.

कोणतीही वैयक्तिक माहिती आदेशाच्या प्रतीमध्ये राहणार नाही
न्यायालयाने पुढे म्हटले की, कोणत्याही आदेशात ‘A vs B’, ‘P vs D’ लिहिले आणि वाचले जाईल. ऑर्डरमध्ये ई-मेल आयडी, मोबाईल किंवा टेलिफोन नंबर, पत्ता आणि वैयक्तिकरित्या ओळखण्यायोग्य माहितीचा उल्लेख केला जाणार नाही. कोणत्याही साक्षीदारांची नावे किंवा त्यांचा पत्ता सूचीबद्ध केले जाणार नाही. सध्याच्या आदेशाबाबत न्यायालयाने म्हटले की, या आदेशात सामान्य मार्गदर्शक तत्त्वे असल्याने ती अपलोड करण्याची परवानगी आहे.

सुनावणी दरम्यान न्यायालयात मर्यादित कर्मचारी राहतील
खटल्याशी संबंधित नोंदी सीलबंद ठेवाव्यात आणि न्यायालयाच्या आदेशाशिवाय कोणालाही देऊ नये असे न्यायालयाने म्हटले आहे. वकील-ऑन-रेकॉर्ड वगळता इतर कोणालाही कोणत्याही दाखल/ऑर्डरची तपासणी किंवा कॉपी करण्यासाठी कडक निर्बंध असतील. सुनावणी दरम्यान न्यायालयात फक्त सपोर्ट स्टाफ (लिपिक, शिपाई इ.) राहतील असेही न्यायालयाने म्हटले आपल्या सुनावणीत म्हटले आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Bombay high court ban media reporting on Sexual harassment cases  of proceedings.

हॅशटॅग्स

#HighCourt(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x