3 December 2024 10:35 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stocks | कुबेरचा खजिना आहे हा स्वस्त शेअर, दिला 2000% परतावा, खरेदीला गर्दी - BOM: 540693 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - GMP IPO Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, शेअर BUY, SELL की Hold करावा - NSE: YESBANK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: NBCC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, कंपनीबाबत अपडेट, शेअर होणार रॉकेट - NSE: TATAPOWER BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL 7th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी गुड-न्यूज, 53% डीएसह 2 भत्त्यांमध्ये मोठी वाढ झाली
x

Navjot Singh Sidhu Resigned | नवज्योत सिंग सिद्धू यांचा पंजाब काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा, तर अमरिंदर सिंग दिल्लीला

Navjot Singh Sidhu

चंदीगड, २८ सप्टेंबर | कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर अखेर नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu resigned) यांनीही पंजाबच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. सिद्धू हे चरणजीतसिंग चन्नी मंत्रिंडळात उपमुख्यमंत्री होणार असल्याने त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असावा अशी चर्चा आहे.

navjot-singh-sidhu

After the resignation of Capt. Amarinder Singh as the Chief Minister, finally Navjot Singh Sidhu resigned as the State President of Punjab. As Sidhu will be the Deputy Chief Minister in Charanjit Singh Channi’s cabinet :

अशातच अमरिंदर सिंग हे दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजप प्रमुख जे. पी. नड्डा यांची भेट घेणार असल्याचे सूत्राने सांगितले.काँग्रेसमध्ये नवज्योत सिंग सिद्धूबरोबर टोकाचे मतभेद झाल्यानंतर अमरिंदर सिंग यांनी 18 सप्टेंबरला संपूर्ण कॅबिनेटचा राजीनामा दिला होता. मुख्यंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी नाराजी जाहीरपणे व्यक्त केली होती. तेव्हा अमरिंदर सिंग म्हणाले होते, की मी स्वत:ला अपमानित झाल्यासारखे वाटत आहे. त्यानंतर पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिल्यानंतर पंजाबमधील राजकारणात मोठी उलथापालथ घडली आहे. त्यानंतर अमरिंदर सिंग हे कोणता निर्णय घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे. अमरिंदर सिंग हे काँग्रेस सोडणार का? काँग्रेस सोडल्यानंतर पुढील पाऊल कोणते उचलणार? पंजाबमध्ये पुढील वर्षात 2021 मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहे. त्यापूर्वी काँग्रेसने अमरिंदर सिंग यांना हटवून पंजाबमध्ये प्रथमच मागासवर्गीय घटकामधील नेत्याला मुख्यमंत्रीपदाची संधी दिली आहे.

राजीनामा दिल्यानंतर अमरिंदर सिंग यांनी काँग्रेसवर टीका केली होती. मात्र, काँग्रेस सोडणार की नाही, कोणत्या पक्षात जाणार याची माहिती अमरिंदर सिंग यांनी जाहीर केलेली नाही. पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी कॅप्टन अमरिंदर सिंग हे भाजपमध्ये सहभागी होऊ शकतात. ते दुसऱ्या पक्षाची घोषणा करू शकतात. कॅप्टन अमरिंदर सिंग हे भाजपमध्ये प्रवेश करतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. कारण, त्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर चांगले संबंध आहेत.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Navjot Singh Sidhu resigned from the post of Punjab Congress state president.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x