24 November 2024 2:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News 8th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, नव्या वर्षात पगारात 186 टक्क्यांनी वाढ होणार, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | 10 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, 6 महिन्यात 116% परतावा दिला, संधी सोडू नका - BSE: 540259 Apollo Micro Systems Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट - NSE: APOLLO Post Office Interest | पोस्टाच्या 'या' 9 योजनांवर मिळते धमाकेदार व्याज, 10 रुपयांपासून देखील सुरू करू शकता गुंतवणूक
x

शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कारखान्यांची यादी साखर आयुक्तालयाकडून जाहीर | भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांचेही कारखाने

Black listed Sugar Factory

पुणे, २८ सप्टेंबर | इतिहासात पाहिलांदाच साखर कारखानदारीवर जाहीर आणि ठोस भूमिका साखर आयुक्तालयाकडून घेण्यात आली आहे. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कारखान्यांची थेट यादी साखर आयुक्तालयाकडून जाहीर करण्यात आली आहे. इतिहासात पहिल्यांदाच साखर आयुक्तालयाकडून अशी यादी (Black listed Sugar Factory) काढण्यात आली आहे. राज्यातील एकूण 44 कारखाने हे रेड झोनमध्ये म्हणजे एफआरपी वेळेत न देणारे कारखाने म्हणून घोषित केले आहे. एवढ्यावरच साखर आयुक्त थांबले नसून शेतकऱ्यांनी ऊस कारखान्याना घालताना ही यादी लक्षात घेऊन ऊस कोणत्या कारखान्याला घालावा, असे आवाहनही केले आहे. महत्त्वाचे म्हणजे अनेक पुढाऱ्यांच्या करखान्यांचाही यामध्ये समावेश आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे, सुभाष देशमुख, समाधान औताडे, हर्षवर्धन पाटील, विजयसिंह मोहिते यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांचा या यादीत समावेश आहे.

A direct list of factories cheating farmers (Black listed Sugar Factory) has been released by the Sugar Commissioner. For the first time in history, such a list has been drawn up by the Sugar Commissioner :

मागील २ वर्षाच्या कारकिर्दीत काम करत असताना असे लक्षात आले आहे की, साखर कारखानदाऱ्यांची परिस्थिती कशी आहे? सर्वसामान्य सभासदांना ते सभासद असतानाही ते कळत नाही. बऱ्याच वेळा खोटे आश्वासन देऊन एफआरपीपेक्षा जास्त पैसे देऊ, असे सांगून लोकांना आमिष दाखवले जाते. प्रत्यक्षात अशी परिस्थिती नसते. त्याचे परिणाम म्हणून काही कारखाने सुरुवातीला ५ टक्के मग १० टक्के पैसे देतात. मात्र, हंगाम संपला तरीही त्यांना फक्त ४० टक्केच पैसे दिलेले असतात. ज्या शेतकऱ्याने दोन वर्षांपूर्वी ऊस लावला आहे त्याला जर अशा पद्धतीने पैसे मिळणार असतील तर हे बरोबर नाही. म्हणून आम्ही चांगले कारखाने कोणते आणि वाईट कारखाने कोणते? हे शेतकऱ्यांसमोर आणले पाहिजे. यामुळे शेतकऱ्यांना त्रास होणार नाही. म्हणूनच यादी काढण्यात आली आहे, अशी माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी यावेळी दिली.

मे अखेरीस एकही शेतकऱ्याचा ऊस शिल्लक राहणार नाही:
मी राज्यातील शेतकऱ्यांना हे लक्षात आणून दिले आहे की, कोणत्या कारखान्याने मागच्या वर्षी एफआरपी ३१ डिसेंबरला दिली आहे. ३१ मार्चपर्यंत कोणी दिली आहे आणि ऑगस्ट अखेरीस कोणी दिलेले नाही, हे स्पष्ट करून देण्यात आले आहे. यामागील उद्दिष्ट असा की, गळीत हंगामात शेतकरी फसू नये. त्याने एकमेकांना माहिती दिली पाहिजे. यंदा राज्यात ८० हजार टनाने कारखान्यांची क्षमता वाढली आहे. त्यामुळे कोणीही घाबरू नये. मे अखेरीस एकाही शेतकऱ्याचा ऊस शिल्लक राहणार नाही. याचीही हमी आम्ही देत आहोत. ऊस जास्त आहे म्हणून काही टोळ्या शेतकऱ्यांची फसवणूक करत असतात. त्यासाठी देखील आम्ही परिपत्रक काढले असल्याचे आयुक्त गायकवाड यांनी यावेळी सांगितले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Black listed sugar factory in  Maharashtra declared by Sugar Commissioner in Pune.

हॅशटॅग्स

#SugarFactories(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x