21 November 2024 5:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE ICICI Mutual Fund | ICICI चा धमाकेदार फंड पाहिलात का, 5 लाखांचे झाले 3.5 करोड, इथे वाढवा पैशाने पैसा - Marathi News Home Loan Alert | तुम्ही सुद्धा होम लोन घेताय का; थांबा या 5 गोष्टींचा तटस्थपणे विचार करा, फायदा होईल - Marathi News Job Opportunity | तरुणांनो लाखोंच्या घरात पगार घेण्याची वेळ आली; ITBT मध्ये 526 जागांसाठी मेगा भरती सुरू, पटापट अर्ज करा Railway Ticket Booking | तिकीट कॅन्सल करण्याऐवजी ट्रान्सफर करा कॅन्सलेशन चार्जेसपासून वाचाल; पहा नवा नियम काय सांगतो
x

Bhartiya Jai Hind Party | भ्रष्टाचार बाहेर काढायचे असतील तर दिल्लीला जाऊन गुजरातच्या भाजपा नेत्यांचे काढा

Bhartiya Jai Hind Party

ठाणे, ३० सप्टेंबर | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जरंडेश्वर साखर कारखाना आणि पाटबंधारे खात्यात होत असलेल्या तथाकथित भ्रष्टाचाराबद्दल भाजपाचे माजी खासदार किरीट सोमैय्या यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्याचा निषेध करण्यासाठी आज भारतीय जय हिंद पार्टी (Bhartiya Jai Hind Party) तर्फे ठाण्यात चक्काजाम आंदोलन करण्यात आला होता.

Former BJP MP Kirit Somaiya had strongly criticized Ajit Pawar for so called corruption. Chakkajam agitation was organized by Bhartiya Jai Hind Party in Thane today to protest against it said Bhartiya Jai Hind Party leader Balasaheb Bhosale :

भारतीय जयहिंद पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब भोसले यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यातील तीन हातनाका येथील पूर्व द्रुतगती मार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान बाळासाहेब भोसले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी किरीट सोमैय्या यांच्या पोस्टरला जोडे मारत निषेध व्यक्त केला. प्रश्न व भ्रष्टाचार बाहेर काढायचे असेल तर गुजरात आणि दिल्ली येथे जाऊन भाजपा नेत्यांचे काढा, असे आवाहन बाळासाहेब भोसले यांनी केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सिंचन घोटाळ्यात आधीच क्लीनचिट दिली असली तरीही केवळ सूडबुद्धीने भाजपा नेत्यांकडून त्यांच्यावर टीका करण्यात येते असा आरोप त्यांनी केला.

भारतीय जयहिंद पार्टीचे पूर्ण समर्थन असल्याचे सूतोवाच यावेळी बाळासाहेब भोसले यांनी केले. भाजपा पक्षात सगळेच आलबेल नसून त्यांच्या नेत्यांचे देखील मोठमोठे घोटाळे आहेत ते किरीट सोमैय्या यांच्या घरात घुसून आपण लवकरच बाहेर आणू असा इशारा बाळासाहेब भोसले यांनी दिला. यावेळी पोलिसांनी बाळासाहेब भोसले यांच्यासह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Bhartiya Jai Hind Party protest at Thane against BJP leader Kirit Somaiya.

हॅशटॅग्स

#KiritSomaiya(31)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x