21 November 2024 9:33 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

खोटे आरोप करून पळ काढला? | परमबीर सिंग चंदीदडहून नेपाळ आणि नेपाळमार्गे लंडनला पळाल्याची शक्यता

Parambir Singh missing

मुंबई, ०१ ऑक्टोबर | एसीबीच्या रडारवर असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh Missing) यांनी मुंबईतून काढता पाय घेतल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यावर बोलताना माध्यमांमधून तशी माहिती कळत आहे, अजून याबद्दल ठोस माहिती मिळाली नसल्याचे स्पष्टीकरण गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहे.

Former Commissioner of Police Parambir Singh, who is currently not reachable, fled the country before the first summons was issued. There are rumors that Singh fled from Chandidad to London via Nepal and Nepal. Parambir Singh Missing :

काही वरिष्ठ सूत्रांच्या माहितीनुसार, सध्या नॉट रिचेबल असलेले माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग त्यांना पहिले समन्स देण्याअगोदरच देशाबाहेर पळाले आहेत. सिंग हे चंदीदडमधून नेपाळ आणि नेपाळमार्गे लंडनला पळून गेल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे.

अजून ठोस माहिती नाही:
गृहमंत्रीगेल्या काही दिवसांपासून परमबीर सिंग हे नॉट रिचेबल असून ते कोणाच्याही संपर्कात नसल्याची माहिती समोर येत आहे. परमबीर सिंग यांच्या देशाबाहेर पलायनाच्या बातम्यांवर बोलताना गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांमधून अशी माहिती समोर येत असल्याचे म्हटले आहे. याविषयी अजून ठोस माहिती मिळाली नाही असे वळसे पाटील म्हणाले. पोलीस परमबीर सिंग यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत. कोणत्याही अधिकाऱ्याने रजेवर असताना आपण कुठे आहोत हे कळविणे गरजेचे असते. मात्र सिंग यांनी याबाबतीत काही कळविलेले नाही असे पाटील म्हणाले. राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी केंद्र सरकारच्या संपर्कात आहे, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे.

परवानगीशिवाय ते बाहेर जाऊ शकत नाहीत:
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. “केंद्रीय गृह मंत्रालयासोबतच आम्ही देखील परमबीर सिंह यांना शोधत आहोत. मी ऐकलं की ते भारताबाहेर गेले आहेत. पण एक सरकारी अधिकारी म्हणून ते सरकारच्या परवानगीशिवाय परदेशात जाऊ शकत नाहीत”, असं वळसे पाटील म्हणाले. परमबीर सिंह रशियात असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. त्यावर गृहमंत्री बोलत होते.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Parambir Singh missing since allegations over Anil Deshmukh.

हॅशटॅग्स

#Crime Patrol(311)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x