4 December 2024 2:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Investment Tips | असा वाढेल पैशाने पैसा, तुमच्याकडील पैसे पुन्हा होतील डबल; या पर्यायांमध्ये गुंतवणूक करा - Marathi News Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE IPO GMP | स्वस्त IPO आला रे, ग्रे-मार्केट'मध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी मल्टिबॅगर परतावा मिळेल - GMP IPO 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगा'बाबत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट, कर्मचारी आणि पेन्शनधारकांना धक्का Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SUZLON Horoscope Today | काहींचा सामाजिक क्षेत्रात सहभाग वाढेल तर काहींना मिळेल यशाची गुरुकिल्ली, जाणून घ्या तुमचे राशिभविष्य HAL Vs BEL Share Price | HAL आणि BEL डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट, मजबूत कमाई होणार - NSE: HAL
x

Deglur Biloli Bypoll | देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपाकडे उमेदवार नाही | भाजप शिवसेना नेत्या भरोसे?

Deglur Biloli Bypoll

नांदेड, ०१ ऑक्टोबर | काँग्रेस नेते रावसाहेब अंतापूरकर यांचे काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे निधन झाले होते. ते नांदेड जिल्ह्यातील देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघाचे (Deglur Biloli Bypoll) आमदार होते. त्यांच्या निधनानंतर देगलूर-बिलोली मतदारसंघाची जागा सध्या रिक्त आहे. त्यामुळे या जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. याच कारणामुळे येथील राजकारण तापले आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय पक्षांनी पावलं टाकायला सुरुवात केली आहे.

Congress leader Raosaheb Antapurkar died a few days ago due to corona. He was MLA of Deglur Biloli Bypoll in Nanded district. The seat of Deglur-Biloli constituency is currently vacant after his death :

दरम्यान, नांदेडमधील देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी (Deglur Biloli) काँग्रेसकडून जितेश अंतापूरकर (Jitesh Antapurkar) यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. जितेश हे दिवंगत आमदार रावसाहेब अंतापूरकर (Raosaheb Antapurkar) यांचे सुपुत्र आहेत. नांदेड जिल्ह्यातील देगलूर – बिलोली विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी 30 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. तर 3 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

दुसरीकडे या पोटनिवडणुकीसाठी भाजपाकडून शिवसेनेचे सुभाष साबणे इच्छुक आहेत. सुभाष साबणे हे माजी आमदार असून, त्यांनी रावसाहेब अंतापूरकर यांच्याविरोधात शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. सुभाष साबणे शिवसेना सोडून भाजपकडून उमेदवारी घेण्याच्या तयारीत आहे. मुंबईत याबाबत भाजपची काल बैठक झाली. भाजपकडे तुल्यबळ उमेदवार नसल्याने माजी आमदार सुभाष साबणे याना संधी मिळू शकते.

सुभाष साबणे हे शिवसेनेचे जुन्या पिढीतील नेते आहेत. ते तीन वेळा विधानसभेवर निवडून गेले आहेत. 1999 ते 2009 या काळात ते मुखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. तर 2004 मध्ये ते देगलूरमधून विधानसभेवर निवडून गेले. गेल्या विधानसभा निवडणुकीत (2019) ते देगलूरमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. मात्र रावसाहेब अंतापूरकर यांनी साबणेंचा पराभव केला होता.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Deglur Biloli Bypoll BJP do not have strong candidate against congress.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x