16 April 2025 6:44 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Home Loan | एसबीआय बँकेच्या कर्जाचे दर कमी झाले, आता गृहकर्जासाठी किती व्याज द्यावे लागेल पहा Horoscope Today | 16 एप्रिल 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार बुधवार 16 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक पुन्हा तुफान तेजीत, शॉर्ट टर्म टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RPOWER Vodafone Idea Share Price | हा पेनी स्टॉक मालामाल करणार, सध्याच्या लेव्हल पासून 63 टक्के परतावा मिळेल - NSE: IDEA Yes Bank Share Price | येस बँक शेअर्समध्ये तेजी, पेनी स्टॉकची जोरदार खरेदी, तज्ज्ञांनी काय म्हटलं - NSE: YESBANK Rattan Power Share Price | अप्पर सर्किट हिट, पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, संधी सोडू नका - NSE: RTNPOWER
x

Sharad Shatnam Health Scheme | शरद शतम: योजनेमार्फत ज्येष्ठ नागरिकांना मोफत आरोग्य चाचणी - धनंजय मुंडे

Sharad Shatnam Health Scheme

मुंबई, ०१ ऑक्टोबर | शरद पवार यांच्या नावानं राज्यातील वृद्धांसाठी आरोग्य योजना प्रस्तावित आहे. लवकरच तसा प्रस्ताव राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत मांडला जाईल, अशी घोषणा मंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे. ते बीडमध्ये पत्रकारांशी बोलत होते. वयाची साठी ओलांडल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना विविध आजार बळावतात. त्यासाठी त्यांना वेळोवेळी तपासणी करण्याची गरज असते. या सगळ्यांसाठी हजारो रुपयांची आवश्यकता असते. मात्र अनेकांच्या आर्थिक परिस्थितीमुळे रुग्णालयात जाणं त्यांना शक्य होत नाही. असा सगळा विचार करुन राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी शरद पवार यांच्या नावाने आरोग्य योजना शरद शतम: योजना (Sharad Shatnam Health Scheme) प्रस्तावित आहे.

Many cannot afford to go to the hospital because of their financial situation. With all this in mind, Sharad Shatnam Health Scheme is proposed in the name of Sharad Pawar for senior citizens of the state :

काय आहे शरद शतम: योजना?
राज्यातील वयोवृद्ध नागरिकांसाठी शरद शतम: योजना आहे. या योजनेअंतर्गत 65 वर्षावरील सर्व वयोवृद्धांच्या आरोग्य चाचण्या मोफत केल्या जाणार आहेत. वर्षातून एकदा या सर्व चाचण्या मोफत केल्या जाणार आहेत. या चाचण्यांमुळे आजाराचे निदान वेळेवर होऊन उपचार करता येतील.

आरोग्य विमा कवच योजना:
जेष्ठ नागरिकांवर आधुनिक राहणीमानाचा ताण पडत आहे. त्याचबरोबर त्यांच्या आरोग्य व इतर गरजा पूर्ण करण्यासाठी आर्थिक परिस्थितीचाही त्यांना सामना करावा लागत आहे. वेळोवेळी आरोग्य तपासण्या न करता आल्यामुळे विविध आजार शेवटच्या टप्प्यात लक्षात येतात. त्यामुळे उपचारास विलंब होतो व रुग्ण दगावण्याचा धोका असतो. या सर्व बाबींचा विचार करुन, ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य विमा कवच योजना सुरु करण्याचा निर्णय याअगोदर घेण्यात आला आहे. त्यासाठी राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Sharad Shatnam Health Scheme for senior citizens free health check up.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या