21 November 2024 9:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Mumbai Potholes | मुंबई भाजपाच्या आंदोलनाची संपूर्ण पोलखोल | पूर्वनियोजित होती पोलिसांची बदनामी करण्याची योजना

Mumbai potholes

मुंबई , ०२ ऑक्टोबर | मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जसजशी जवळ येतं आहे तसं मुंबईतील राजकीय वातावरण तापू लागलं आहे. त्याच अनुषंगाने भारतीय जनता पक्षाने मुंबई महानगरपालिकेच्या रस्त्यांवरील खड्ड्यांवरून (Mumbai Potholes) सत्ताधारी शिवसेनेला लक्ष केलं आहे. त्याच अनुषंगाने मुंबई भाजपच्या युवा मोर्चाने आज मुंबई अंधेरी पूर्व येथील रस्त्यांवरील खड्ड्यांवरून आंदोलन करून मुंबई महानगरपालिकेला लक्ष करण्याचा प्रयत्न केला. मात्र या आंदोलनासाठी मुंबई भाजपने कोणतीही पूर्व परवानगी घेतली नव्हती.

Mumbai Potholes. ‘Won’t tolerate such police atrocities’ Devendra Fadnavis and Ashish Shelar condemn lathicharge on BJYM activists protesting against potholes :

आंदोलन जरी मुंबई महानगरपालिकेच्या विरोधात असलं कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने आंदोलन पोलीस यंत्रणेलाच हाताळावं लागत आणि त्यात महापालिकेचा कोणताही सहभाग नसतो. परिणामी, मुंबई पोलिस कायदेशीर कारवाई करणार हे माहित असल्याने भाजपच्या संबंधित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एक सुनियोजित कट आखला असंच म्हणावं लागेल. विशेष म्हणजे भाजपाच्या खोट्या रणनीतीप्रमाणे यामध्ये राज्यातील सर्वच म्हणजे फडणवीस, चंद्रकांतदादा ते संबंधित पदाधिकारी सर्वच जण सामील झाल्याचं दिसतंय.

एकूण संबंधित भाजप पदाधिकाऱ्याने रचलेला सुनियोजित प्लान हा स्वतःची राजकीय प्रतिमा मोठी करण्यासाठी असावा आणि त्यासाठी पक्षातील वरिष्ठांना खोटी आणि चुकीची माहिती दिली असं म्हणावं लागेल. आंदोलनाच्या ठिकाणी जे घडलंच नाही ते सुनियोजित (स्क्रिप्टेड) करून मुंबई पोलिसांच्या बदनामीसाठी एक खोटी स्टोरी रचून पुन्हा राज्य सरकारला कोंडीत पकडण्यासाठी एक विचित्र सुनियोजित आंदोलन केल्याचं आता खाली पुराव्यानिशी स्टेप बाय स्टेप देतं आहोत. आमच्या प्रतिनिधीने दिलेली सर्व माहित, पण त्यात पहिल्यांदा फोटो पाहू आणि शेवटी व्हिडिओ ज्यामध्ये सुनियोजित आंदोलनाची आणि संबंधित पदकधीकार्याची पोलखोल होईल.

१. आंदोलन झालं तिथे नेमकं काय घडलं:
ठरल्याप्रमाणे भाजपचे युवा पदाधिकारी आणि कार्यकर्ते अंधेरी पूर्वेकडील खड्डे असलेल्या रस्त्यावर आंदोलनासाठी जमले ज्यासाठी कोणतीही पूर्व परवानगी घेतलेली नव्हती. खबरदारीचा उपाय म्हणून आंदोलनाच्या ठिकाणी म्हणजे रोड क्रमांक ११ येथे पोलीस (MIDC पोलीस स्टेशन) उपस्थित होते आणि भाजपचे युवा पदाधिकारी आणि कार्यकर्ते संबंधित ठिकाणी जमल्यावर राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरु झाली आणि अधिक विलंब न करता काही क्षणातच भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी संबधित खड्डे असलेल्या रस्त्यावर हातात निदर्शनाचे बोर्ड घेऊन झापले. त्यात खड्डे असलेल्या रस्त्यावर झोपल्याने ट्राफिक वर्दळ पूर्णपणे थांबली. त्यानंतर पोलीस थोडे पुढे सरकले पण कार्यवाही केली नाही. पोलीस जवळ आल्याने कार्यकर्ते एकमेकांना रस्त्यावर एकमेकांना खेटून झोपले तसेच पोलीस रस्ता खाली करण्यासाठी आंदोलकांना ताब्यात घेणार असं वाटताच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची खड्डे असलेल्या रस्त्यावर झोपलेल्या अवस्थेतच आपसात रेटारेटी झाली आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांचे हात उभे असलेल्या कार्यकर्त्यांनी घट्ट पकडण्यास सुरुवात केली. आणि परिणामी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर आणि हातावर रॅशेस पडले.

त्यानंतर वाहतूक कोंडी अजून वाढू लागल्याने पोलीस आंदोलक कार्यकर्त्यांच्या जवळ येऊन उभे राहिले. त्यानंतर काही मिनिटातच पोलिसांनी वाहतुकीचा रस्ता अडवल्याने कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात झाली आणि त्यात रेटारेटी आणि घॊषणाबाजी झाली आणि त्यात पोलिसांनाच अधिक धक्काबुक्की करण्यात आली (त्याचे फोटो पुरावे आहेत, पण योग्य वेळी म्हणजे भाजप पुढे काय करणार ते पाहून पुरावे देऊ). आंदोलकांना पोलिसांनी एकाबाजूने हात आणि दुसऱ्या बाजूने पाय धरून सुरक्षितपणे पोलीस वाहनात भरताना दोन्ही बाजूने खेचाखेची झाली आणि अचानक भाजप कार्यकर्त्यांनी संबंधित पदाधिकाऱ्याचा हात सोडल्याने ते जमिनीवर आपटले आणि त्याच्या पाठीला थोडं खरचटलं आणि उजव्या हाताला थोडं चिरल्या सारखं झालं, त्याला कारणीभूत खेचाखेचीत झटकन हात सोडणारे भाजप कार्यकर्ते होते. (या लेखाच्या सर्वात खालील व्हिडिओत पाहू शकता, ०१.०५ व्या सेकंदापासून ते १.१४ व्या सेकंदापर्यंत). मात्र, कोणत्याही प्रकारचा लाठीचार्ज झाला नाही किंवा ती वेळच पोलिसांवर आली नाही. पोलीस संबंधित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना घेऊन पोलीस स्थानकात गेले.

२. संबंधित आंदोलक पदाधिकाऱ्याकडून वरिष्ठांना प्लानप्रमाणे ‘स्क्रिप्टेड’ माहिती:
आंदोलक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर आंदोलकांनी ठरवल्याप्रमाणे वरिष्ठांना लाठीचार्ज आणि पदाधिकाऱ्यांना अमानुष मारहाण झाल्याची ‘धादांत खोटी’ माहिती देण्यास सुरुवात झाली आणि त्यानंतर भाजपचा इतिहास असल्या प्रमाणे समाज माध्यमांवर एक अभियान सुरु करून धूळफेक करण्यास सुरुवात झाली आहे. अगदी ‘अमानुष’ शब्द पॉलिटिकली कॅश करण्यासाठी संबंधित पदाधिकारी नंतर इस्पितळात दाखल झाले. त्यानंतर फडणवीस, चंद्रकांत पाटील, प्रसाद लाड, अतुल भातखळकर, निलेश राणे, नितेश राणे (नितेश राणेंनी लाठीचार्जचा दावा केलेला नाही) यांनी त्यावर थेट लाठीचार्जचे खोटे ट्विट करण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे एकानेही लाठीचार्ज केल्याचा व्हिडिओ असं काही शेअर केलेलं नाही. पण मुंबई पोलिसांविरोधात थेट पोलीस आयुक्तालयावर मोर्चा काढण्याच्या धमक्या देण्यास सुरुवात झाली आहे.

३. ताजींदर सिंग तिवानाने पोलिसांविरोधात आधीच रचली होती खोटी ‘स्क्रिप्ट’: (त्यांची पोलखोल शेवटी व्हिडिओमध्ये दिसेल)
भाजप मुंबई युवामोर्चाचे अध्यक्ष ताजींदर सिंग तिवाना यांना पोलिसांनी ताब्यात घेण्यापूर्वीच रस्त्यावर झोपल्यावर अनेकदा कार्यकर्त्यांची रेटारेटी झाल्याने चेहऱ्यावर आणि हातावर रॅशेस पडले होते. त्यालाच त्यांनी पोलिसांनी लाठीचार्ज आणि मारहाण झाल्याचं भासवलं. त्यासाठी खालील हे दोन फोटो पहा (हात उजवा). आंदोलकांना पोलिस उचलून पोलीस वाहनात बसवण्यासाठी घेऊन जात असताना दुसऱ्या बाजूने अनेक भाजप कार्यकर्त्यांनी जोर लावून संबंधित पदाधिकाऱ्यांचे हात ओढण्यास सुरुवात केली आणि दुसऱ्या बाजूने पोलिसांनी जोर लावताच अचानक भाजप कार्यकर्त्यांनी संबंधित पदाधिकाऱ्याचे हात सोडल्याने तो जमिनीवर आपटले आणि त्याच्या पाठीला खरचटलं आणि उजव्या हाताला थोडं चिरल्या सारखं झालं, त्याला कारणीभूत खेचाखेचीत झटकन हात सोडणारे भाजप कार्यकर्ते होते. (या लेखाच्या सर्वात खालील व्हिडिओत पाहू शकता, ०१.०५ व्या सेकंदापासून ते १.१४ व्या सेकंदापर्यंत)

BJP-BMC

आता हा फोटो पहा…. रस्त्यावर झोपल्यावर झालेल्या रेटारेटीत संबधित पदाधिकाऱ्याच्या चेहऱ्यावर जे रॅशेस उठले तेच त्यांनी इस्पितळात आमदार प्रसाद लाड यांना दाखवत पक्षासाठी किती यातना झेलल्या त्याचा पाढा वाचला आणि आमदार प्रसाद लाड यांनी पोलिसांनी न केलेल्या कृत्यावरून संबंधित पोलिसांना थेट निलंबित करा, अन्यथा पोलीस आयुक्तालयावर मोर्चा काढू अशी धमकीच दिली.

Mumbai-BJP-BMC

आता त्याच पदाधिकाऱ्याचा खाली फोटोमध्ये डावा हात पहा, त्याआधारे त्याने पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेताना मारहाण आणि लाठीचार्ज केल्याने टीशर्ट फाटल्याचा आरोप केला आहे. म्हणजे पोलिसांनी हात लावण्यापूर्वी टीशर्ट अर्थातच डाव्या हाताला फाटलेला नसणार… बरोबर?

Mumbai-BJP-Fake-Andolan

भाजप आ. आशिष शेलारांच्या व्हिडिओत पदाधिकाऱ्याची पोलखोल: (टीशर्ट आधीच फाडून ठेवलेलं)
हेच आंदोलन सुरु असतानाचा २ मिनिट १६ सेकंदाचा व्हिडिओ भाजपचे मुंबईतील आमदार आशिष शेलार यांनी शेअर केला. याच व्हिडिओच्या २१ व्या सेकंद पर्यंत आंदोलक रस्त्यावर झोपून घोषणाबाजी करताना दिसत आहेत. आणि व्हिडिओच्या २२ व्या सेकंदाला पोलीस पुढे येऊन संबधित पदाधिकाऱ्याला पहिल्यांदा उजव्या हाताला धरून वर उठवताना दिसत आहेत. त्यानंतर ३६ व्या सेकंदाला संबंधित पदाधिकारी स्वतःचा डावा हात (टीशर्ट फाटलेली बाजू) पुढे करून पोलिसांवर आरोप करताना दिसतोय.

म्हणजे पुराव्यानुसार पोलीस २२ व्या सेकंदाला कारवाईसाठी पुढे आले आणि २३ व्या सेकंदाला संबंधित पदाधिकाऱ्याला स्पर्श केला. याचा अर्थ कमीत कमी २३-२५ सेकंदापर्यंत पदाधिकाऱ्याचा टीशर्ट व्यास्थित होता असं समजू. आता याच व्हिडिओमध्ये त्यापूर्वीचा पार्ट व्यवस्थित निरखून पहा… म्हणजे व्हिडिओतील सुरुवातीचा ०.०१ सेकंदापासून ते ०.०६ सेकंदापर्यंत उभी असलेले एक पत्रकार वारंवार ‘ये फ्लेक्स हटा, ये फ्लेक्स हटा’ असं वारंवार संबंधित पदाधिकाऱ्याकडे पाहून बोलत आहे, पण संबंधित पदाधिकाऱ्याने त्याच्या टीशर्टचा डावा हात आधीच फाडून ठेवल्याने (पोलिसांनी हात लावण्यापूर्वी) तो फ्लेक्समागे हात लपवत होता. तो फाटलेला टीशर्ट ०.०१ सेकंदापासून ते ०.०६ सेकंदादरम्यान तुम्ही पाहू शकता जेव्हा त्याच्या हातातील फ्लेक्स काही सेकंदासाठी बाजूला झाला होता.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Mumbai potholes BJP agitation against BMC fact check scripted plan against Mumbai Police.

हॅशटॅग्स

#BJPMaharashtra(691)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x