23 November 2024 5:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, असं मिळेल रेल्वेचं सर्वांत स्वस्त तिकीट, ठाऊक आहे हा फंडा My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता
x

लालबाग राजा मुजोर कार्यकर्त्यांची दादागिरी, थेट आयपीएस अधिकाऱ्यावर धावले

मुंबई : गणेश उत्सव संपल्यावर या कार्यकर्त्यांना आजूबाजूची लोक सुद्धा विचारत नसतील, परंतु लालबागचा राजा विराजमान होताच या कार्यकर्त्यांमध्ये आपणच या शहराचे सर्वेसेवा असल्यासारखे भासू लागते. एखादी मालदार पार्टी, दिग्गज उद्योगपती किंवा मातब्बर राजकारणी लालबागच्या राजाच्या भेटीला आले की एकदम त्याच क्षणी हातांच्या माळ गुंफत रॉयल वागणूक दिली जाते. बाकी हेच हात सामान्य भाविकांवर, वृद्ध महिलांवर, पोलीस महिलांवर उगारण्यासाठीच वापरले जातात.

आज तर या मुजोर कार्यकर्त्यांची दादागिरी चक्क झोन ३ चे पोलीस उपायुक्त अभिनाश कुमार यांना धक्काबुक्की करण्यापर्यंत जाऊन पोहोचली. वास्तविक त्या कार्यकर्त्याना आयपीएस अधिकारी म्हणजे काय हे माहित असलं तरी पुष्कळ झालं. स्थानिक रहिवाशी तसेच कार्यकर्त्यांनी कोणत्याही रांगेशिवाय आपल्या ओळखीच्या व्यक्तींना थेट स्टेजवर चढून चरणस्पर्श घेण्यासाठी बाप्पाच्या समोरून एक मार्ग खुला ठेवण्यात आला आहे. याच खुल्या मार्गाद्वारे अतिमहत्वाच्या व्यक्तींना तसेच ओळखीच्या व्यक्तींना रांगेशिवाय सेटिंगने झटपट दर्शन दिले जाते. परंतु, स्वतःच्या परिचयाच्या व्यक्तींना हे कार्यकर्ते दर्शन देण्यासाठी इतके आतुरलेले असतात की ‘आपण हाय ना इथे, ये तू, डायरेक्ट घेऊन जातो’ अशा थाटातच मोबाईलवर वावरत असतात. यांच्यावर मंडळातील वरिष्ठांचं नियंत्रण किती असत ते बाप्पाचं जाणोत.

सुरक्षेसाठी उपस्थित असलेल्या पोलिसांच्या निदर्शनास ते आले आणि त्यामुळे इतर सामान्य भाविकांचा होणारा गोंधळ कमी करण्यासाठी झोन ३ चे पोलीस उपायुक्त अभिनाश कुमार पुढे सरसावले असता तिथल्या कार्यकर्त्याला जणू ओळखीच्या लोकांसमोर वट कमी झाल्यासारखी वाटली आणि समोर कोण आहे याचा जराही विचार न करता ते मुजोर कार्यकर्ते थेट आयपीएस अधिकारी अभिनाश कुमार यांच्या अंगावर धावून गेले. जोश मध्ये येऊन त्यांच्या अंगावर धावून तर गेले आणि पोलीस यंत्रणा सुद्धा शांतपणे घेईल, परंतु गणपती विसर्जनानंतर पोलिसांकडून त्या कार्यकर्त्यांसाठी वेगळया आरतीचे आयोजन केले गेल्यास नवल वाटायला नको, असं प्रथम दर्शनी तिथलं वातावरण पाहायला मिळालं. कारण पोलीस अधिकाऱ्यांच्या तेही आयपीएस अधिकाऱ्याच्या अंगावर धावून गेल्याने कोणता गुन्हा नोंदवला जातो याची त्यांना समज नसावी.

लालबागचा राजा मंडळाचे कार्यकर्ते आणि पोलीस उपायुक्त अभिनाश कुमार यांच्याशी आधी शाब्दिक बाचाबाची झाली. त्यांनतर पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर कार्यकर्ते धावून गेले. कार्यकर्त्यांची ही अरेरावी पाहून पोलीस उपायुक्त तसेच अन्य पोलीस अधिकारी प्रचंड संतापलेले पाहायला मिळत होते. बाप्पाचे चरण दर्शन देण्यावरून तसेच अन्य कोणत्या ना कोणत्या कारणावरून धक्काबुक्की, हाणामारी राजाच्या दरबारात होतच असते. त्याचप्रमाणे कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस उपायुक्त अभिनाश कुमार यांना काही कार्यकर्त्यांनी अपशब्द वापरून त्यांच्याशी दादागिरी केली. याआधी सुद्धा एका महिला पोलिसांच्या श्रीमुखात राजाच्या कार्यकर्त्याने लगावली होती. तसेच दर्शनासाठी आलेल्या भाविकांशी अभद्रपणे कार्यकर्ते वागतात हे अनेकदा समोर आले आहे.

हॅशटॅग्स

BJP(447)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x