21 November 2024 10:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Facebook Popularity Declining | फेसबुकची लोकप्रियता घसरणीला | कंपनीने केलं मान्य

Facebook Popularity Declining

वॉशिंग्टन, ०५ ऑक्टोबर | सोशल मीडिया कंपनी फेसबुकला आतापर्यंत अतिशय शक्तिशाली मानले जात हाेते. परंतु फेसबुकच्या लोकप्रियतेत सातत्याने घसरण होत (Facebook Popularity Declining) असल्याचे दिसून आले आहे. अमेरिकेतील तरुणांना आता फेसबुकमध्ये फार रस राहिलेला नाही. तूर्त कंपनीसमोर आर्थिक संकट नसले तरी आगामी काळात कंपनीला समस्यांना तोंड देण्याची वेळ येऊ शकते, असा गाैप्यस्फोट एका अंतर्गत अहवालात करण्यात आला आहे.फेसबुकमध्ये अंतर्गत द्विस्तरीय निगराणी व मूल्यमापनाची यंत्रणा आहे. कंपनीला या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. कोराेनाकाळात चुकीच्या माहितीमुळे फेसबुकला फटका बसल्याचे मानले जाते. आता फेसबुकची कंपनी इन्स्टाग्रामवर बाॅडी इमेजचा मुद्दा आणखी नाराजी वाढवणारा ठरला आहे. जगभरातील अनेक देशांत फेसबुकला सरकारच्या नाराजीला देखील तोंड द्यावे लागत आहे.

Facebook Popularity Declining is accepted by company. Although the company is not facing a financial crisis, the company may face problems in the near future, according to an internal report :

अमेरिकेत फेसबुकच्या विरोधात अनेक खटले चालवले जात आहेत. कंपनीतील उच्चपदस्थ अधिकारीही खुलेपणाने आपले म्हणणे मांडू लागले आहेत. अमेरिकन सिनेटच्या अलीकडे झालेल्या सुनावणीत फेसबुकच्या ग्लोबल सेक्युरिटी प्रमुख अँटीगाेन डेव्हिसच्या खासदारांनी ग्राहकांच्या सुरक्षेबाबत मोठ्या प्रमाणात टीका केली. फेसबुककडून आपल्या प्रतिमेत सुधारणा करण्यासाठी मोठ्या पातळीवर प्रयत्न केले जात नाहीत. लहान मुलांचे इन्स्टाग्राम अॅप आणणे आणि पुन्हा लोक अमेरिकन सरकारच्या विरोधामुळे ते मागे घेण्याचा निर्णय फेसबुकला घ्यावा लागला.अनेक देशांत सोशल मीडियावर बंदी आहे. काही सरकारांनी तर केवळ सरकारी मीडियालाच देशात परवानगी दिली आहे. त्यात उत्तर कोरियासारख्या देशांचा समावेश होतो. सोशल मीडियामधून सरकारच्या विराेधातील मतप्रदर्शन अनेकवेळा या क्षेत्रातील कंपन्यांसाठी अडचणीचे ठरते.

आतापर्यंत शाॅन नावाने पडद्याआड राहिलेली व्हिसलब्लाेअरने आपली आेळख जाहीर केली आहे. फेसबुकच्या प्राॅडक्ट मॅनेजर राहिलेल्या फ्रान्सिस हाउगन यांनी सनसनाटी खुलासा केला आहे. साेशल मीडिया कंपनी फेसबुकने वारंवार खासगीपणा, सुरक्षेकडे दुर्लक्ष करून नफ्यावर लक्ष केंद्रित केले. किशाेरवयीन मुलांसाठी इन्स्टाग्राम आणल्याने काय परिणाम हाेतील, याची फेसबुकला पूर्ण कल्पना हाेती, असा आराेपही त्यांनी केला.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Facebook Popularity Declining is accepted by company.

हॅशटॅग्स

#facebook(30)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x