Lars Vilks | स्वीडिश व्यंगचित्रकार लार्स विल्क्सच्या मृत्यूनंतर रझा अकादकडून मिठाई वाटप
मुंबई, ०५ ऑक्टोबर | मोहम्मद पैगंबरांचे व्यंगचित्र काढणारे स्वीडनचे व्यंगचित्रकार लार्स विल्क्स (Lars Vilks) यांचा अपघाती मृत्यू झाला. यापूर्वी ते दोनवेळा अपघातातून वाचले होते. 14 वर्षांपूर्वी त्यांनी पैगंबरांचे व्यंगचित्र काढले होते. त्यानंतर त्यांना जिवे मारण्याच्या धमक्या येत होत्या. दोनदा ते हल्ल्यातून वाचले होते. रस्ते अपघातात त्यांचा मृत्यू झाला.
Lars Vilks dies in car accident celebrated by Raza academy. Swedish cartoonist Lars Vilks, who drew cartoons of the Prophet Muhammad, has died in an accident. He had survived the accident twice before. He drew a caricature of the Prophet 14 years ago :
रविवारी पोलीस संरक्षणात पोलिसांच्या कारमधून जात असताना समोरून येणाऱ्या ट्रकची कारला धडक बसली. यामध्ये विल्क्स यांचा मृत्यू झाला. विल्क्स यांच्यासह पोलीस वाहनात असणाऱ्या दोन पोलिसांचा देखील मृत्यू झाला आहे. स्वीडनच्या क्रोनोबर्गमध्ये हा अपघात झाला. ट्रक ड्रायव्हर जखमी असून त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. लार्स यांनी 2007 मध्ये मोहम्मद पैगंबरांचे व्यंगचित्र त्यांनी काढले होते. यामुळे त्यांच्यावर दोनवेळा हल्ले झाले होते. 2011 मध्ये एका व्यक्तीने आपला गुन्हा कबुल केला होता. त्याला 2014 मध्ये शिक्षा ठोठावण्यात आली होती. यानंतर 2015 मध्ये दुसरा हल्ला झाला होता.
फ्रान्सचे मॅगझीन चार्ली हेब्दोमध्ये देखील पैगंबरांवरील आक्षेपार्ह कार्टून छापण्यात आले होते. यानंतर लार्स यांनी संरक्षण मागितले होते. रविवारी झालेल्या दुर्घटनेकडे सध्यातरी अपघाताच्या नजरेने पाहिले जात आहे. तरीदेखील पोलीस घातपाताच्या दिशेने चौकशी करत आहेत. प्रत्यक्षदर्शींनुसार ज्या गाडीचा अपघात झाला त्या गाडीचा वेग खूप जास्त होता.
दरम्यान, भारतातील इस्लामी समुदायांना प्रोत्साहन देणारी मुंबईस्थित रझा अकादमी या संस्थेने व्यंगचित्रकाराच्या मृत्यूचा ‘उत्सव’ साजरा करण्यासाठी मिठाई वाटली. रझा अकॅडमीचे अध्यक्ष सईद नूरी म्हणाले की, ‘लार्स विल्क्स यांचे निधन झाल्याचा त्यांना आनंद आहे. ते म्हणाले की, लार्स विल्क्सवर अज्ञात व्यक्तींनी दोनदा हल्ला केला. 2010 मध्ये, लार्स विल्क्सच्या घरी जाळपोळ केली होती, पण तो तेव्हा घरात नव्हता. 2015 मध्ये पुन्हा त्याला डेन्मार्कमध्ये एका पार्टीदरम्यान गोळ्या घालण्यात आल्या. पण अल्लाहने त्याला आता एका कार अपघातात जाळून टाकले आहे, असं ते म्हणाले.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.
News Title: Lars Vilks dies in car accident celebrated by Raza academy.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार